Pm Narendra Modi यांना ज्यो बायडेन यांनी सांगितला मुंबईत पत्रकाराने प्रश्न विचारल्याचा ‘तो’ किस्सा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी जो बायडेन यांची पहिलीच भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. कोरोना संकट, ग्लोबल वॉर्मिंग, इंडो पॅसिफिक विषयांवर भारतासोबत काम करण्याची इच्छा बायडेन यांनी बोलून दाखवली आहे. याबद्दल मोदींनी बायडेन यांचे आभार मानले आहेत. या भेटी दरम्यान ज्यो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र […]
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी जो बायडेन यांची पहिलीच भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. कोरोना संकट, ग्लोबल वॉर्मिंग, इंडो पॅसिफिक विषयांवर भारतासोबत काम करण्याची इच्छा बायडेन यांनी बोलून दाखवली आहे. याबद्दल मोदींनी बायडेन यांचे आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT
या भेटी दरम्यान ज्यो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबई भेटीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘मी जेव्हा मुंबईच्या दौऱ्यावर आलो होतो तेव्हा भारतीय पत्रकारांनी मला विचारलं की माझे कुणी नातेवाईक भारतात राहतात का? त्यावेळी एका पत्रकारानेच उत्तर दिलं की आमच्या भारतात पाच बायडेन आहेत’ हा किस्सा ऐकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरलं नाही.
#WATCH | Washington DC: US President Joe Biden recalls his visit to Mumbai as the then US Vice President and, in a lighter vein, says, “Indian Press asked me if I have any relative in India…Someone from the Indian Press said you have five Bidens in India…” pic.twitter.com/Vv8KnNbYF9
— ANI (@ANI) September 24, 2021
तुमच्या नेतृत्वात भारत आणि अमेरिका यांच्यातील चांगल्या संबंधांच्या विस्ताराची बीज रोवली गेली आहेत असं म्हणत जो बायडेन यांनी मोदींचं कौतुक केलं आहे. अमेरिका आणि भारत एकत्रितपणे विविध प्रकारच्या जागतिक समस्यांवर तोडगा काढू शकतात त्या दिशेने एकत्र काम करू शकतात असंही बायडेन यांनी म्हटलं आहे. 2006 मध्ये मी उपाध्यक्ष होतो, 2020 पर्यंत भारत आणि अमेरिका आणखी जवळ येतील असं मी तेव्हा म्हटलं होतं ते माझे शब्द खरे ठरले आहेत असंही बायडेन म्हणाले.
हे वाचलं का?
मोदी-कमला भेट चर्चेत का आहे?
बायडेन यांच्या भेटीदरम्यान मोदी म्हणाले की, मी पाहतोय की या दशकात तुमच्या नेतृत्वात आपण जे बीज लावू ते भारत आणि अमेरिकेसह संपूर्ण जगातील लोकशाही देशांसाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये व्यापार हा महत्वाचा घटक आहे. या दशकात आपण एकमेकांना पूरक होऊ शकू. अमेरिकेकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची भारताला गरज आहे. तर भारताकडेही अनेक गोष्टी आहेत ज्या अमेरिकेच्या उपयोगी येतील. या दशकात व्यापार एक प्रमुख क्षेत्र असेल, असंही मोदी यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
भेटीदरम्यान राष्ट्रपती जो बायडेन यांनी पुढील आठवड्यात येणारी गांधी जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात आम्ही गांधी जयंती साजरी करणार आहोत. गांधीजींचा अहिंसेचा संदेश आज पहिल्यापेक्षा अधिक पटीने महत्वाचा आहे, असं बायडेन म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT