‘कांतारा आणि द काश्मीर फाईल्स’ ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट नाहीत! काय मग सत्य, वाचा सविस्तर
द काश्मीर फाईल्स, कांतारा या चित्रपटांची ऑस्करसाठी निवड झाली, हे ऐकून तुम्ही सेलिब्रेशन करत आहात का? करत असाल तर थोडं थांबा. कारण, या दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी तुम्हाला-आम्हाला शब्दांमध्ये फसवलं आहे. ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि ‘कांतारा’चे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी ट्विट करुन प्रेक्षकांची काहीशी दिशाभूल केली आहे. दिशाभूल कशी? ‘द काश्मीर फाइल्स’ आणि […]
ADVERTISEMENT

द काश्मीर फाईल्स, कांतारा या चित्रपटांची ऑस्करसाठी निवड झाली, हे ऐकून तुम्ही सेलिब्रेशन करत आहात का? करत असाल तर थोडं थांबा. कारण, या दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी तुम्हाला-आम्हाला शब्दांमध्ये फसवलं आहे. ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि ‘कांतारा’चे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी ट्विट करुन प्रेक्षकांची काहीशी दिशाभूल केली आहे.
दिशाभूल कशी?
‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘कांतारा’ हे दोन्ही चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमध्ये आहेत हे अगदी सत्य आहे. पण अद्याप ऑस्करच्या नामांकनासाठी या दोन्ही चित्रपटांची निवड झालेली नाही. हे चित्रपट केवळ सर्व मापदंड पूर्ण करुन ऑस्कर नामांकनासाठी मतदान प्रक्रियेच्या टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत. जर मतदानात या दोन्ही चित्रपटांची निवड झाली, तरचं या चित्रपटांना ऑस्करचं नामांकन मिळू शकणार आहे.
विवेक अग्निहोत्री काय म्हणाले?
विवेक अग्निहोत्री ट्विट करुन लिहितात की, ‘ऑस्कर 2023’ साठी अकादमीच्या पहिल्या यादीत ‘द काश्मीर फाईल्स’ शॉर्टलिस्ट झाली आहे. हा भारतातील पाच चित्रपटांपैकी एक आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो. दुसऱ्या ट्विटमध्ये अग्निहोत्री लिहितात, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, अनुपम खेर हे सर्व सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट झाले आहेत. पण ही फक्त सुरूवात आहे. रस्ता मोठा आहे.. सर्वांनी आशीर्वाद द्या!
#PallaviJoshi #MithunChakraborty @DarshanKumaar @AnupamPKher are all shortlisted for best actor categories. It’s just the beginning. A long long road ahead. Pl bless them all. pic.twitter.com/fzrY9VKDcP
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 10, 2023