पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा
पुढचे चार ते पाच दिवस राज्यातल्या अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. IMD चे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे उद्या (7 ऑक्टोबर) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड […]
ADVERTISEMENT
पुढचे चार ते पाच दिवस राज्यातल्या अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. IMD चे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे उद्या (7 ऑक्टोबर) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील काही भागात 8 ऑक्टोबरला पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे वाचलं का?
6 Oct,पुढचे 4,5 दिवस राज्यात अनेक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.
?नम्र विनंती, वीजा चमकत असताना प्लीज बाहेर पडू नका. प्राप्त रिपोर्टनुसार राज्यात काही ठिकाणी वीजांमुळे जीवीत हानी झाली आहे,तेव्हा काळजी घ्या.
Pl take all care when its lightning ? pic.twitter.com/YBkSXyzZZz— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 6, 2021
9 ऑक्टोबरला नाशिक, पालघर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, कोल्पारू, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
जेव्हा वीज कडाडत असेल त्यावेळी विशेष काळजी घ्या असंही आवाहन करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT