Amruta Fadnavis: विरोधक सरकारला गद्दार म्हणतात, मात्र बोलणाऱ्यांची विश्वासार्हता काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ३० जूनला महाराष्ट्रात स्थापन झालं. त्याआधी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षे होतं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आलं. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यामुळे शिवसेना दुभंगली. तसंच महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ३० जूनला जेव्हापासून हे सरकार आलं आहे तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या गटाला गद्दार म्हटलं जातं आहे. याबाबत आता अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

लोक मामी म्हणतात हे ऐकून कसं वाटतं? अमृता फडणवीस म्हणतात…

अमृता फडणवीस विरोधकांना उद्देशून नेमकं काय म्हणाल्या आहेत?

सगळ्यांना माहित आहे की एकनाथ शिंदे यांचं सरकार कसं आलं? या सरकारचा बेस काय आहे तेदेखील सगळ्यांना माहित आहे. जे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या गटाला गद्दार म्हणतात त्यांची विश्वासार्हता काय? त्यामुळे त्याबाबत काही बोलणं किंवा प्रतिक्रिया देणं हे बिलो डिग्निटी होईल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. याशिवाय इतर विषयांवरही अमृता फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हे वाचलं का?

‘देवेंद्र फडणवीस रात्री वेशांतर करायचे अन्…’, सरकार स्थापनेवर अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

दहीहंडी आणि गोविंदांबाबत काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

दहीहंडीचा खेळ श्रीकृष्णापासून सुरू झाला आहे. या खेळाला एक मजबूत पाठिंबा दिलाच पाहिजे. ही परंपरा आपण अजूनही साजरी करतो आहे. गोविंदाला आरक्षण दिलं आहे ही चांगलीच गोष्ट आहे. साहसी खेळ आहे, सगळे लोक एकत्र येतात. कुठलाही भेदभाव या खेळात नाही. अशा खेळांना जरूर प्रोत्साहन दिलं पाहिजे ते सरकारने दिलं आहे असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. आपल्या देशाचे सणवार आहेत ते पुढे न्यायचे आहेत. सण-परंपरांना वाव मिळाला पाहिजे. आता पूर्णपणे या परंपरा पुन्हा सुरू झाल्या आहेत याचा आनंद वाटतो असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.

ADVERTISEMENT

२१ जूनला राज्यात राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच बंड पुकारलं तेव्हापासून शिवसेना दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. एक आहे शिंदे गट आणि दुसरा आहे ठाकरे गट. उद्धव ठाकरेंसमोर आपला पक्ष वाचवण्याचं आव्हान आहे तर आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रा काढून नव्याने पक्षबांधणी करत आहेत. अशात ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटाला गद्दार म्हटलं जातं आहे. त्यावर आज अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस यांनीही उत्तर देत जे टीका करतात त्यांची विश्वासार्हता काय असा प्रश्न विचारला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT