विधानसभा अध्यक्षांची निवड तर झाली, आता विरोधी पक्षनेता निवडणार शरद पवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. १६४ आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मिळाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाची मतं तसंच अपक्ष आमदारांची ही मतं राहुल नार्वेकर यांना मिळाली आहेत. बहुमत चाचणी सोमवारी होणार आहे. ती चाचणीही भाजप आणि शिंदे गट जिंकतील हेच दिसतंय. अशात आता विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण? हे शरद पवार ठरवणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता शिवसेनेपेक्षा आमदारसंख्या जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा होणार आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी जयंत पाटील यांनी हे उत्तर दिलं आहे.

जयंत पाटील यांनी काय म्हटलं आहे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार आहे. विरोधी पक्षनेत्याचं पद कुणाला द्यायचं याचा निर्णय शरद पवार घेणार आहेत. शरद पवार हे बैठक घेणार आहेत. त्यामध्ये ते नाव ठरवतील” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचे ३९ सदस्य शिंदे गटाला मिळाले आहेत त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ कमी झालं आहे. आता विरोधी पक्षेतेपदी राष्ट्रवादीचा नेता बसणार हे स्पष्ट झालं आहे. आज शरद पवार याचसंदर्भात यांनी बैठक बोलावली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेता अनुभवी असावा हे शरद पवारांना वाटतं आहे. विरोधी पक्षनेता आमचा असला तरीही तो महाविकास आघाडीसोबत असेल असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

छगन भुजबळ किंवा अजित पवार यांची नावं चर्चेत आहेत. तसंच जयंत पाटील यांचंही नाव चर्चेत आहे. यापैकी कुठल्या नावाला शरद पवार पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीचं सरकार असताना विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी त्यांची ही कारकीर्द सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं. सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, पेनड्राईव्ह बॉम्ब, परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब, अनिल देशमुख नवाब मलिक प्रकरण यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घेरलं होतं.

आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेला सुरुंग लागला आणि एकनाथ शिंदेंसह ३९ आमदारांनी बंड पुकारलं. त्यामागेही देवेंद्र फडणवीस असल्याची चर्चा झाली. आता शिंदे फडणवीस सरकारला टक्कर देणारा नेता म्हणून शरद पवार कुणाला निवडणार हे पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT