जाणून घ्या सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या राहुल नार्वेकरांविषयी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची आज निवड झाली. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतं मिळून विजयी झाले आहेत. विजयासाठी 145 मतांची गरज असताना राहुल यांना समर्थनार्थ 164 मते मिळाली. राहुल नार्वेकरांना राजकीय घराण्याची पार्श्वभूमी आहे. ते महाराष्ट्रातील कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांच्याशी होता. राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) एक प्रसिद्ध चेहरा आहेत. नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुल नार्वेकर पहिल्यांदाच आमदार झाले.

Live Updates : विधानसभेत पहिली लढाई शिंदेंनी जिंकली, १६४ मतं मिळवत राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राहुल नार्वेकरांचे वडील नगरसेवक राहिले आहेत

राहुल नार्वेकर यांचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळचा संबंध आहे. राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या युथ विंगचे प्रवक्तेही राहिले आहेत. राहुल नार्वेकर हे राजकीय घराण्यातील आहेत. राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर हे नगरसेवक राहिले आहेत. 2014 मध्ये राहुल नार्वेकर शिवसेनेत होते. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा दावा केला होता, मात्र त्यांना तिकीट मिळाले नव्हते.

ADVERTISEMENT

शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली होती, मात्र राहुल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर राहुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

ADVERTISEMENT

आघाडी सरकारच्या काळात अध्यक्षपद रिक्त होते

मागील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद फेब्रुवारी 2021 पासून रिक्त होते. महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर आता सोमवारी फ्लोर टेस्ट होणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT