मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण अत्यंत सुमार दर्जाचं-फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उत्तरादाखल केलेलं भाषण अत्यंत सुमार होतं अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात असा काही कंटेटच नव्हता ज्यावर काही प्रतिक्रिया देता येईल. आज मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्यासाठी भ्रमनिरास हा शब्दही छोटा आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. पाहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? शिवसेना स्वातंत्र्य […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उत्तरादाखल केलेलं भाषण अत्यंत सुमार होतं अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात असा काही कंटेटच नव्हता ज्यावर काही प्रतिक्रिया देता येईल. आज मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्यासाठी भ्रमनिरास हा शब्दही छोटा आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पाहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
शिवसेना स्वातंत्र्य लढ्यात नव्हती हे त्यांनी मान्य केलं हे एकप्रकारे बरं झालं. पण त्यांना हे माहित नसेल की संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य सेनानी होते. इतिहासाची माहिती नसताना राजकीय भाषण अगदी विनाकारण केलं. मुख्यमंत्र्यांचं भाषण हे निराश करणारं चौकातलं भाषण होतं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एवढं सुमार भाषण यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झालं नाही.
पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ
भाजपने जर मुख्यमंत्र्यांवर टीका केली, गैर कारभार दाखवला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही कसा काय ठरतो? आमच्या बोलण्यामुळे नाही तर तुमच्या कृतीमुळे महाराष्ट्राची बदनामी होते आहे. राम मंदिरासाठी जर जनता पैसे देते आहे तर यांना एवढं वाईट का वाटतं आहे? खंडणी वसूल करणाऱ्यांना जनतेचं समर्पण काय कळणार असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
आपल्या भाषणात उत्तर देत असताना आपण महाराष्ट्र विधानसभेत बोलतो आहोत याचाच विसर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पडला. महाराष्ट्राच्या विषयांवर त्यांना बोलता येत नाही हेच मोठे अपयश आहे. आम्ही कोरोनाच्या भ्रष्टाचाराची जी प्रकरणं बाहेर काढली त्याबद्दल त्यांच्याकडे काहीही उत्तर नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
संभाजी नगर नाव करून दाखवावं
औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून दाखवावं. मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतात मात्र ते नामांतर करणार नाहीत कारण त्यांना खुर्ची प्यारी आहे अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.