फी न भरल्याने अमरावतीत पेपर हिसकावला, विद्यार्थ्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं

मुंबई तक

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती विद्यार्थ्यांने महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावल्याचा प्रकार अमरावतीत घडला आहे. यानंतर अनिकेत निरगुडवार या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या अमरावती मधील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी महाविद्यालयातली ही घटना आहे. आपल्या मुलाने शाळेच्या फी चे पैसे भरले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती

विद्यार्थ्यांने महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावल्याचा प्रकार अमरावतीत घडला आहे. यानंतर अनिकेत निरगुडवार या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या अमरावती मधील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी महाविद्यालयातली ही घटना आहे.

आपल्या मुलाने शाळेच्या फी चे पैसे भरले नाही म्हणून त्याचा पेपर हिसकावल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.या घटनेमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी महाविद्यालयाविरोधात बडनेरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आत्महत्या करणारा विद्यार्थी हा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून तो वसुधा देशमुख यांच्या महाविद्यालयात बी. टेक च्या अंतिम वर्षांचे शिक्षण घेत होता. विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करावी ही मागणी भाजपचे शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.तर बडनेरा पोलीस भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू केले आहे.

खळबळजनक घटना : तपोवन एक्स्प्रेसच्या खिडकीला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

हे वाचलं का?