Adani Group ला ‘सर्वोच्च’ झटका; सुप्रीम कोर्ट करणार हिंडेनबर्गच्या आरोपांची चौकशी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Adani-Hindenburg matter: नवी दिल्ली: अदाणी समूहाला (Adani Group) सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) मोठा झटका दिला आहे. गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी हिंडेनबर्गच्या (Hindenburg Report) आरोपांची चौकशी करण्याची गरज असल्याचं सांगत न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. इतकचं नाही सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशी करण्यासाठी न्यायालयाने ६ सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे. (The Supreme Court ordered a probe into the Adani-Hindenburg matter and set up an experts committee to be headed by its retired judge AM Sapre.)

ADVERTISEMENT

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायाधीश पीएस नरसिम्हा आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. याशिवाय न्यायालयाने सेबीलाही या प्रकरणात दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अदाणी समूहाविरोधात हिंडनबर्गच्या अहवालाशी संबंधित 4 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांच्या सुनावणीवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. दरम्यान, गौतम अदानी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समिती स्थापन करण्याच्या आदेशाचे स्वागत केले. तसंच “सत्याचा विजय होईल” असंही ते म्हणाले.

Gautam Adani: अदाणींची श्रीमंतांच्या यादीतून घसरगुंडी सुरूच… आता किती संपत्ती?

हे वाचलं का?

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमध्ये कोण कोण?

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. याशिवाय यात न्यायमुर्ती जेपी देवधर, बॅंकर ओपी भट्ट, केव्ही कामथ, उद्योजक नंदन निलकेनी आणि शेखर सुंदरेशन असणार आहेत.

काय आहे प्रकरण?

अमेरिकास्थित फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म Hindenburg Research ने दोन वर्ष इन्व्हेस्टिगेशन करून एक रिपोर्ट समोर आणला आहे. हजारो कागदपत्रांची छाननी आणि अनेक देशांमध्ये दौरा केल्यानंतर Hindenburg research ने हा अहवाल तयार केला आहे. यात अदाणी समूहावर अनेक आरोप करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Hindenburg Report ने खळबळ : अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण कायम!

ADVERTISEMENT

*रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

1. जगातला तिसरा श्रीमंत व्यक्ती जगातली सर्वात मोठी चोरी करत आहेत. अकाऊंटिंग फ्रॉडचे आरोप

2. गेल्या 3 वर्षात उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत कमालीची वाढ

3. गेल्या 3 वर्षात गौतम अदानींना तब्बल 100 अब्ज डॉलरचा नफा झाला

4. 7 लिस्टेड कंपन्यांचे भाव तब्बल 819 टक्क्यांनी वाढले आहेत.

*कोणत्या आहेत या कंपन्या?

1. अदानी पोर्ट्स

2. अदानी टोटल गॅस

3. अदानी एंटरप्रायझेस

4. अदानी ट्रांसमिशन

5. अदानी पॉवर

6. अदानी विल्मर

7. अदानी ग्रीन एनर्जी

रिपोर्टमध्ये असंही सांगितलंय की अदानी ग्रुपविरोधात तब्बल 17 अरब डॉलरच्या सरकारी फसवणुकीचा तपास झाला आहे, ज्यात मनी लाँड्रिंग, करचोरी आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत.

अदानी ग्रुपवर प्रचंड कर्ज आहे आणि अनेक शेअर्स त्यांनी गहाण ठेवले आहेत. पहिले अदानींचे शेअर्स 2 ते 3 वर्षात 3 हजार टक्क्यांनी वाढले आणि नंतर जेव्हा हेच शेअर्स गगनाला भिडले तेव्हा त्याच शेअर्सवर अदानी ग्रुपने कर्ज घेतली.

अदानींच्या कंपनीतील वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांमध्ये 22 पैकी 8 जण तर अदानी कुटुंबातलेच आहेत. ग्रुपच्या आर्थिक आणि महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यामुळे अदानी कुटुंबीयांचाच कंट्रोल असतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT