Taliye Rescue Operation अखेर पाच दिवसांनी थांबलं, 53 जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या तळिया गावातील मदत आणि बचावकार्य अखेर पाच दिवसांनी थांबलं आहे. हे संपूर्ण गावच या घटनेत उद्ध्वस्त झालं आहे. या घटनेत आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तळिये या गावात 32 घरांवर दरड कोसळली आणि या दरडीखाली सगळं गावच्या गाव गाडलं गेलं. 36 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरडीखाली अख्खं गावच […]
ADVERTISEMENT

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या तळिया गावातील मदत आणि बचावकार्य अखेर पाच दिवसांनी थांबलं आहे. हे संपूर्ण गावच या घटनेत उद्ध्वस्त झालं आहे. या घटनेत आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. तळिये या गावात 32 घरांवर दरड कोसळली आणि या दरडीखाली सगळं गावच्या गाव गाडलं गेलं. 36 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
दरडीखाली अख्खं गावच गडप झालं. त्यामुळे गाव शोकसागरात बुडालं आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गावात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 24 जुलैला या गावाचा दौरा केला होता. पडलेली घरं, चिखल, दगडमातीचा ढिग, दरड कोसळल्याचा खुणा असं अस्वस्थ करणारं चित्र या ठिकाणी पाहून त्यांचंही मन हेलावलं. आता या घटनेत 53 जणांचा मृत्यू झाला आहे.
अशी आहे मृतांची यादी