Maratha Reservation : …तर मग मला मुख्यमंत्री करा – खासदार संभाजीराजे
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. बीडमध्ये एका संवाद यात्रेत बोलत असताना संभाजीराजे यांनी उपस्थितांना थेट मला मुख्यमंत्री करा असं म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण ही मागणी केल्या काही दिवसांपासून जोर धरायला लागली आहे. […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. बीडमध्ये एका संवाद यात्रेत बोलत असताना संभाजीराजे यांनी उपस्थितांना थेट मला मुख्यमंत्री करा असं म्हटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण ही मागणी केल्या काही दिवसांपासून जोर धरायला लागली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात संवाद यात्रेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना याबद्दल थेट प्रश्न विचारला. मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्या अशी मागणी तुम्ही का करत नाही असा प्रश्न विचारला असता संभाजीराजेंनी, “मी ही मागणी करु शकत नाही. हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्र्यांना विचारा, पालकमंत्र्यांना हा प्रश्न विचारा. ते नाही जमलं तर संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा मी बहुजनांचे प्रश्न सोडवतो”, असं उत्तर दिलं.
संभाजीराजेंच्या या वक्तव्यामुळे भविष्यात त्यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा प्रगट केली केली आहे का अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. या संवाद यात्रेदरम्यान संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका मांडलेली पहायला मिळाली. “राज्य सरकारकडे सारथी संदर्भात व इतर काही मराठा समाजाच्या मागण्या दिल्या आहेत. त्या पूर्ण करू, असा शब्द राज्य सरकारने दिला आहे. मात्र, त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर छत्रपतींची भूमिका बदलेल. हात वर येतील, बोट समोर येतील, कॉलर वर येईल, बटणं उघडतील, एवढेच नाही तर कपडे देखील डार्क होतील”, असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे.










