माझ्यासाठी भोंगे नाही तर महागाई आणि सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे-सुप्रिया सुळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

माझ्यासाठी भोंगे नाही तर महागाईचा प्रश्न, देशाच्या आर्थिक स्थितीचा प्रश्न आणि सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आत्ता जे काही देशात चाललं आहे ते करण्याची ही वेळ नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे. अहमदनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

ADVERTISEMENT

‘3 तारखेला ईद.. तोवर मशिदीवरील भोंगे उतरवा, नाहीतर…’, राज ठाकरेंचा थेट अल्टिमेटम

काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे?

हे वाचलं का?

भोंग्यावरून राजकारण केलं जातं आहे. विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट केलं जातं आहे. आज मला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनी आपल्या घरी जाऊन आपल्या कुटुंबाला विचारावं की त्यांना महागाईचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो की भोंग्याचा. माझ्यासाठीही भोंग्यांचा प्रश्न महत्त्वाचा नाही तर महागाई, आर्थिक परिस्थिती आणि देशाला तसंच राज्यातल्या सामान्य माणसांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे आहेत.

सिल्वर ओकवर झालेला हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला – सुप्रिया सुळे

ADVERTISEMENT

राज ठाकरेंबाबत मी कशाला काय बोलू? मी माझ्याबाबत बोलू शकते. माझ्या बोलण्यावर मी कंट्रोल ठेवू शकते. आज मला अरूण जेटली यांचे शब्द आठवत आहेत. कैलासवासी अरूण जेटली म्हणायचे की तुम्हाला संसदेत गोंधळ चालला आहे असं वाटलं ना की टीव्ही बंद करून टाका. आपोआप सगळं शांत होईल. सुप्रिया सुळेंनी हा टोलाही भाजपला लगावला.

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे-राज ठाकरे

आणखी काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

५५ वर्षे झाली शरद पवार राजकारणात आहेत. ५५ वर्षे आपलं नाणं मार्केटमध्ये चालतंय कारण शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते आहे हेदेखील सत्य आहे. शरद पवार यांच्यावर अकारण टीका केली जाते आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे अनेकदा अयोध्येला जाऊन आले आहेत. त्यामुळे ते परत चालले असतील तर त्यात विशेष काही नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसंच सध्या अर्थकारण हळूहळू रुळावर येतं आहे. हा देश त्या परिस्थितीतून सुधारणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्ता कोणतंही राजकारण करण्याची गरज नाही असंही त्या म्हणाल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्रातला चर्चेचा विषय ठरले आहेत. कारण त्यांनी ज्या दोन सभा घेतल्या त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण हे एका विशिष्ट दिशेने जातं आहे असं दिसून येतं आहे. अशात आज सुप्रिया सुळे यांनी हे सगळं राजकारण करण्याची ही वेळ नाही असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT