बीड : अंबाजोगाईत पोलिसांच्या घरात घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल चोरीला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणि गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण यावरुन विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी सरकारला धारेवर धरलं. आमदारांच्या तक्रारीची दखल घेत गृहमंत्री वळसे पाटलांनी पोलीस अधिक्षक राजा रामास्वामी यांना सक्तीच्या रजेवरही पाठवलं. परंतू अद्याप या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाहीये. बीडच्या अंबाजोगाईत सहायक पोलीस निरीक्षकाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारुन लाखोंचा मुद्देमाल पळवून नेला आहे.

ADVERTISEMENT

अंबाजोगाईतील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक पदावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांचे अंबाजोगाईतील पोखरी रोडवरील पिताजी सारडा नगरीत घर आहे . त्यांची पत्नी कोमल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , ४ मार्च रोजी सर्व कुटुंबीय घराला कुलूप लावून बीडला गेले होते . ७ मार्च रोजी रात्री ११ वाजता ते घरी परतले असता त्यांना घराचा कडी कोयंडा तुटलेला दिसला.

बीडचे पोलीस अधिक्षक सक्तीच्या रजेवर, गृहमंत्री वळसे-पाटलांची विधानसभेत घोषणा

हे वाचलं का?

घरात जाऊन पाहणी केली असताना, त्यांना चोरट्यांनी आपल्या घरातलं सामान अस्ताव्यस्त टाकून कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले मिनी गंठन , नेकलेस , झुंबर , टॉप्स असे १० तोळे सोन्याचे दागिने आणि तीन घड्याळे असा एकूण १ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे दिसून आलं. यानंतर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर पोलिसांचीच घरं सुरक्षित राहणार नसतील तर सर्वसामान्यांनी कोणाकडून अपेक्षा ठेवायची असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारताना दिसत आहेत.

अकोला: पोटच्या अल्पवयीन मुलीवर सलग 2 वर्ष बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT