PM Modi यांनी 88 मिनिटाच्या भाषणात पाहा कोणता शब्द किती वेळा उच्चारला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून दीर्घ भाषण केले. 88 मिनिटांच्या भाषणात पीएम मोदींनी शेतकरी, तरुण, दलित, ओबीसी या सगळ्यांविषय भरभरुन बोलले आहेत. यासोबतच त्यांनी आत्मनिर्भक भारत, अमृत उत्सव संकल्पनेचाही उल्लेख केला. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी आपल्या 88 मिनिटांच्या भाषणात ‘भारत’ हा शब्द सर्वाधिक (66) वेळा वापरला.

ADVERTISEMENT

भाषणानुसार, पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात शेतकरी हा शब्द 29 वेळा, योजना हा शब्द 17 वेळा उच्चारला. त्याच वेळी, गाव, स्वातंत्र्य आणि उत्पादन हे शब्द 15-15 वेळा उच्चारले.

तिसरे सर्वात लांब भाषण

हे वाचलं का?

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी दिलेले हे तिसरं सर्वात प्रदीर्घ भाषण होते. याआधी 2016 साली (94 मिनिटे) आणि 2019 साली (92 मिनिटे) अशी दीर्घ भाषणं दिली होती.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी दिलेल्या भाषणाची वेळ

ADVERTISEMENT

  • वर्ष 2014 – 65 मिनिटे

ADVERTISEMENT

  • वर्ष 2015 – 88 मिनिटे

  • वर्ष 2016 – 94 मिनिटे

  • वर्ष 2017 – 56 मिनिटे

  • वर्ष 2018 – 83 मिनिटे

  • वर्ष 2019 – 92 मिनिटे

  • 2021 च्या भाषणात कोणता शब्द किती वेळा वापरला गेला?

    भारत- 66, शेतकरी- 29, नियोजन -17, गाव, स्वातंत्र्य आणि बांधकाम -15, अमृत महोत्सव आणि संकल्प -14, पाणी, सहकार्य, खेळ, भाषा, कोरोना -11, गरीब, शिक्षण, कायदा -10, 75 वा वर्धापन दिन, परिवर्तन, ऊर्जा -9, ऑलिम्पिक, लस -8, काश्मीर, आयुष्मान भारत, ईशान्य, ओबीसी, दलित/मागास, जागतिक, स्टार्टअप, तंत्रज्ञान -7, महिला/मुली -12, सैनिक शाळा -6, अर्थव्यवस्था, सुधारणा , रेल्वे – 5, पाणी, विभाजन, संरक्षण – 4, आरक्षण, पर्यावरण, रुग्णालय, मुले, लोकसंख्या, रोजगार, स्वावलंबी, विक्रेते, अरबिंदो, शास्त्रज्ञ, कर – 3 इतक्या वेळा हे शब्द उच्चारले गेले आहेत.

    Independence Day 2021: PM Modi यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणातील 10 महत्त्वाच्या घोषणा

    यंदाचा स्वातंत्र्य दिन हा खूपच विशेष आहे. कारण हा 75 वा स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. दरवेळी प्रमाणे या वेळीही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ध्वजारोहण केलं तेव्हा भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरने तिरंग्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT