Video : मुंबई की बिहार? भररस्त्यात वकीलावर तलवारीचे वार, ३ आरोपी अटकेत

मुंबई तक

मुंबईतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे. बोरिवली भागात एका वकीलावर भररस्त्यात टोळक्याने तलवार आणि इतर शस्त्रांनी वार केले. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी या प्रकरणात ३ आरोपींना अटक केली आहे. टोळक्याने केलेल्या या हल्ल्यात वकील सत्यदेव जोशी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ८ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईतील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे. बोरिवली भागात एका वकीलावर भररस्त्यात टोळक्याने तलवार आणि इतर शस्त्रांनी वार केले. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी या प्रकरणात ३ आरोपींना अटक केली आहे.

टोळक्याने केलेल्या या हल्ल्यात वकील सत्यदेव जोशी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ८ जुलै रोजी बोरिवली भागात ही घटना घडल्याचं बोलल जातंय. टोळक्याने वकीलावर हल्ला का केला याबाबतचं कारण समजू शकलेलं नाहीये.

परंतू हा हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे. कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp