अंबरनाथ हादरलं! 21 वर्षीय तरुणीला बोलावून घेत तीन मित्रांनी केला सामूहिक बलात्कार
एका 21 वर्षीय तरुणीवर तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. दारू पित बसलेल्या आरोपींनी तरुणीला फोन करून बोलवून घेतलं आणि त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत सामूहिक दुष्कृत्य केलं. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात अतिरिक्त औद्योगिक वसाहत परिसरात ग्रेट इंडियन पेनिनसुला धरण (जीआयपी डॅम) आहे. […]
ADVERTISEMENT

एका 21 वर्षीय तरुणीवर तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. दारू पित बसलेल्या आरोपींनी तरुणीला फोन करून बोलवून घेतलं आणि त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत सामूहिक दुष्कृत्य केलं. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात अतिरिक्त औद्योगिक वसाहत परिसरात ग्रेट इंडियन पेनिनसुला धरण (जीआयपी डॅम) आहे. पीडिता कल्याणमध्ये राहायला असून, अंबरनाथमध्ये एका दुकानात कामाला आहे. हनुमान हिलम हा पीडितेचा मित्र आहे.
क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर महिलेनं पतीला नजरेसमोर करायला लावला बलात्कार
रविवारी दुपारी हनुमान हिलम हा त्याचे मित्र विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी यांच्यासोबत जीआयपी डॅम परिसरात दारू पित बसले होते. याचदरम्यान हनुमान हिलम याने पीडित तरुणीला फोन केला. आरोपीने तरुणीला जीआयपी डॅम परिसरात येण्यास सांगितलं.