भारतात वेगाने पसरतोय ‘टोमॅटो फ्लू’; लक्षणं काय आहेत आणि कुणाला आहे संसर्गाचा धोका?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जगासोबतच भारतही कोरोना महामारीशी लढा देतोय. कोरोना महामारीनंतर जगभरात मंकीपॉक्सने चिंता वाढवली असून, त्यात आता एका नवीन संसर्गजन्य आजाराने भर घातलीये. हँड फूट माउथ डिसीज (एचएफएमडी) ज्याला टोमॅटो फिव्हर असेही म्हणतात. हा आरोग्य तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण मुलांमध्ये हा आजार झपाट्यानं पसरतोय.

ADVERTISEMENT

लॅन्सेट रेस्पिरेटरी जर्नलमधील अभ्यासानुसार, केरळमध्ये 6 मे 2022 रोजी टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता आणि आतापर्यंत 82 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. एक ते पाच वर्षे वयोगटातील बालके आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या प्रौढांना याचा त्रास जाणवतो.

टोमॅटो फ्लू : 5 वर्षांखालील लहान मुलांमध्ये दिसून येत आहेत लक्षणे

लॅन्सेट प्रकाशित एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, “आम्ही कोविड-19 च्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोक्याचा सामना करत असताना, टोमॅटो फ्लू म्हणून ओळखला जाणारा एक नवीन विषाणू भारतातील केरळ राज्यात 5 वर्षांखालील लहान मुलांमध्ये दिसून आले आहे. आतापर्यंत 82 प्रकरणे नोंदवली गेली आहेत”, अशी माहिती यातून देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

काय आहे टोमॅटो फ्लू?

इंडिया टूडेच्या मते, लॅन्सेट अभ्यासात असे म्हटले आहे की, टोमॅटो फ्लूची लक्षणे कोविड-19 व्हायरससारखीच आहेत. परंतु हा विषाणू SARS-CoV-2 शी संबंधित नाही. तो पूर्णपणे वेगळा आहे. चिकुन गुनिया किंवा डेंग्यू तापानंतर मुलांमध्ये टोमॅटो फ्लू होऊ शकतो. या फ्लूचे नाव टोमॅटो फ्लू आहे कारण यामुळे संपूर्ण शरीरावर लाल आणि वेदनादायक फोड येतात. या फोडांचा आकार टोमॅटोएवढाही असू शकतो.

टोमॅटो फ्लूचा धोका कोणाला आहे?

” लहान मुलं टोमॅटो फ्लूच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त आहे. कारण विषाणूजन्य संसर्ग या वयात लहान मुलांना जास्त होतो,” असे लॅन्सेट अहवालात म्हटले आहे. पाच वर्षांखालील मुलांना या अवस्थेचा सर्वाधिक फटका बसत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. विशेषतः टोमॅटो फ्लू, अत्यंत संसर्गजन्य असूनही, जीवाला धोका नाही.

ADVERTISEMENT

टोमॅटो फ्लूची लक्षणं काय आहेत?

टोमॅटो फ्लू असलेल्या मुलांमध्ये दिसणारी प्राथमिक लक्षणे चिकुनगुनिया किंवा डेंग्यू तापासारखीच असतात. लक्षणांमध्ये उच्च ताप, पुरळ, सूजलेले सांधे, मळमळ, अतिसार, निर्जलीकरण, तीव्र सांधेदुखी यांचा समावेश होतो. शरीर दुखणे, ताप आणि थकवा ही इतर लक्षणे कोविड-19 रूग्णांनी अनुभवली आहेत. काही प्रकरणांमध्ये, रुग्णांच्या त्वचेवर फोडांचा आकार लक्षणीय वाढत जातो.

ADVERTISEMENT

टोमॅटो फ्लू होण्याची कारणं

टोमॅटो फ्लूचे विशिष्ट कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अजूनही संशोधन करत आहेत. परंतु सध्या हा विषाणू संसर्गाचा एक प्रकार मानला जात आहे. डेंग्यू किंवा चिकुनगुनियाचा हा दुष्परिणाम असू शकतो, असेही काहींनी सुचवले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्याचा स्रोत हा व्हायरस आहे. परंतु तो कोणत्या विषाणूमुळे पसरत आहे किंवा कोणत्या विषाणूशी संबंधित आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.

टोमॅटो फ्लूवर काय आहे उपचार?

टोमॅटो फ्लूपासून दूर राहण्यासाठी डॉक्टर स्वच्छ राहण्याचा सल्ला देतात. हा विषाणू पाच वर्षांखालील मुलांसाठी अधिक असुरक्षित असल्याचे मानले जाते. तुमच्या मुलांमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. लहान मुले किंवा प्रौढ ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांनी फोड फोडणे आणि खाजवणे टाळावे. जास्त पाणी प्या. जर एखाद्याला कोणतेही लक्षणे दिसले तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला टोमॅटो ताप आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT