मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

मुंबई तक

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना प्रतिबंध करणारी लस घेतली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील जंबो कोविड सेंटर या ठिकाणी जाऊन त्यांनी कोरोनाची लस घेतली. यासंदर्भातला व्हीडिओ महापौरांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. १ मार्चपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावे असंही आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. Took […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना प्रतिबंध करणारी लस घेतली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील जंबो कोविड सेंटर या ठिकाणी जाऊन त्यांनी कोरोनाची लस घेतली. यासंदर्भातला व्हीडिओ महापौरांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. १ मार्चपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या टप्प्यात सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावे असंही आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

ही बातमी वाचलीत का? भारतात आता २४ तास घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस-डॉ. हर्षवर्धन

मुंबईतल्या झोपडीत राहणारा माणूस असो किंवा इमारतीत राहणारा माणूस असो प्रत्येकापर्यंत लस पोहचली पाहिजे. विरोधकांनी लसीकरणाचं राजकारण करू नये तसं त्यावरून संभ्रमही निर्माण करू नये. जी लस आली आहे ती स्वीकारा. कारण तेवढ्याच मान्यता प्राप्त लोकांनी लसीला मान्यता दिली आहे. कोरोनाला काळाचं औषध आहे. शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती वाढली नाही तर कोव्हिड होतो पण अशा घटना कमी आहेत असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, कोरोनाचा कहर सध्या तरी मुंबईत नाही वरिष्ठ याबाबत योग्य काय तो निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं.

पाहा मुंबई तकचा स्पेशल व्हीडिओ

हे वाचलं का?

    follow whatsapp