मुंबई-गोवा हायवेवर लघुशंकेला उतरलेल्या तिघांना ट्रेलरची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माणगाव: मुबंई-गोवा हायवेवर गुरुवार (13 जानेवारी) सकाळी सात वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. ज्यामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

नेमका अपघात कसा झाला?

मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी 7 वाजता ठाण्याहून मालवण जाणाऱ्या Ertiga MH-04-GJ 9698 गाडीतील तिघे तरुण हे महामार्गाच्या नजीकच लघुशंकेला उतरले. यावेळी मुबंईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरने (MH-46-AF-5605_ ने या तीनही तरुणांना जोरदार धडक दिली. तसंच रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्या कारलाही धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात एका तरुणाचा तर जागीच मृत्यू झाला.

हे वाचलं का?

अमित विनोद कवळे (वय 22 वर्ष) या ठाण्यातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर टेरेस करवालो (वय 22 वर्ष), रोहन जाधव (वय 22 वर्ष) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या कारमधील शुभम गोगले (वय 22 वर्ष) या ठाण्यातील आपल्या मित्रासोबत तीनही तरुण मालवणकडे चालले होते. मात्र, आज सकाळी सातच्या सुमारास कानसई गावच्या हद्दीत बिजली हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली.

ADVERTISEMENT

साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; कारचा चक्काचूर, दोन युवक जागीच ठार

ADVERTISEMENT

या अपघातामुळे काही काळ येथे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. परंतु काही वेळाने दोन्ही वाहने एका बाजूला करुन वाहतुक सुरळीत करण्यात आली.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आता ट्रेलरच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT