विनयभंग प्रकरणी TV अभिनेता प्राचीन चौहानला अटक
टीव्ही सिरीअल आणि वेब सिरीजच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेला अभिनेता प्राचीन चौहानला मुंबईतल्या मालाड पोलीसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. कसौटी जिंदगी की, स्वर्ग, सिंदूर यासारख्या टीव्ही सिरीअलमध्ये प्राचीन चौहानने काम केलं आहे. ३ जुलै (शनिवारी) पीडित तरुणीने मालाड येथील कुरार पोलीस ठाण्यात प्राचीन चौहानविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी IPC 354, 342, 323, 502 […]
ADVERTISEMENT
टीव्ही सिरीअल आणि वेब सिरीजच्या माध्यमातून प्रसिद्ध असलेला अभिनेता प्राचीन चौहानला मुंबईतल्या मालाड पोलीसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. कसौटी जिंदगी की, स्वर्ग, सिंदूर यासारख्या टीव्ही सिरीअलमध्ये प्राचीन चौहानने काम केलं आहे.
३ जुलै (शनिवारी) पीडित तरुणीने मालाड येथील कुरार पोलीस ठाण्यात प्राचीन चौहानविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. ज्यानंतर पोलिसांनी IPC 354, 342, 323, 502 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करत प्राचीनला अटक केली आहे. याआधी प्राचीन चौहानचं नाव अभिनेत्री अर्चना तायडे आणि छवी पांडे यांच्यासोबत जोडलं गेलं होतं.
२००१ साली प्राचीनने प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या कुटुंब या मालिकेतून टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं. याव्यतिरीक्त प्राचीनने जिंदगी, लव्ह मॅरेज, कुछ झुकी पल्के, सिंदूर तेरे नाम का, स्वर्ग अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या फेसबूकवर गाजत असलेल्या SIT या वेबसिरीजमध्ये प्राचीन चौहान छवी मित्तल आणि करन ग्रोव्हर यांच्यासोबत काम करत होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT