Twitter चे नवे बॉस पराग अग्रवाल यांचा नेमका पगार किती?
कॅलिफोर्निया: Twitter च्या CEO पदावरून Jack Dorsey हे बाजूला गेल्यानंतर आता Parag Agrawal हे पद स्वीकारणार आहेत. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे यापूर्वी कंपनीत चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणून कार्यरत होते. पण कंपनीचे CEO म्हणून आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पराग अग्रवाल हे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कंपनीत रुजू झाले होते. 2017 साली त्यांच्यावर त्यांना […]
ADVERTISEMENT

कॅलिफोर्निया: Twitter च्या CEO पदावरून Jack Dorsey हे बाजूला गेल्यानंतर आता Parag Agrawal हे पद स्वीकारणार आहेत. भारतीय वंशाचे पराग अग्रवाल हे यापूर्वी कंपनीत चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणून कार्यरत होते. पण कंपनीचे CEO म्हणून आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
पराग अग्रवाल हे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कंपनीत रुजू झाले होते. 2017 साली त्यांच्यावर त्यांना चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, पराग अग्रवाल हे डोर्सीचे आवडते होते. त्यांनी कंपनीसाठी आवश्यक योगदानही दिले आहे. त्यामुळेच सीईओ पदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही आता त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पराग अग्रवाल यांची कामाची पद्धत आणि समर्पण यामुळे जॅक डोर्सी यांनीही पराग अग्रवालवर खूप विश्वास व्यक्त केला. याआधीही पराग अग्रवाल यांनी AT&T, Microsoft आणि Yahoo यासारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही काम केलं आहे. दरम्यान, पराग अग्रवाल यांची ट्विटरच्या सीईओ पदी निवड झाल्यानंतर ते सोशल मीडियावर ट्रेंड करु लागले.
दरम्यान, अनेकांनी त्यांच्या पगार किती याचा देखील शोध सुरू केला. सोमवारी दाखल केलेल्या SEC कागदपत्रांनुसार, त्यांचा मूळ पगार 1 मिलियन डॉलर म्हणजेच (सुमारे 7.5 कोटी रुपये) असेल. तसेच त्यातील काही रक्कम ही बोनस योजनेचा देखील एक भाग असेल. टार्गेट बोनसमधून त्यांना त्यांच्या पगाराच्या 150% मिळतील. द सनच्या रिपोर्टनुसार, पराग अग्रवाल यांची एकूण संपत्ती 1.52 मिलियन डॉलर एवढी आहे.