बारामती गोळीबारप्रकरणी दोन आरोपींना अवघ्या काही तासात अटक

मुंबई तक

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहेत. तावरे यांच्यावर झालेला गोळीबार (Firing) हा राजकीय वादातून झाला की वैयक्तिक वादातून याचा पोलीस शोध घेत आहेत. बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये काल (1 जून) सायंकाळी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहेत. तावरे यांच्यावर झालेला गोळीबार (Firing) हा राजकीय वादातून झाला की वैयक्तिक वादातून याचा पोलीस शोध घेत आहेत.

बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये काल (1 जून) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी रविराज तावरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी तावरे यांच्या छातीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. बारामतीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया देखील यशस्वी झाल्याची माहिती मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयावर बारामतीत गोळीबार

दरम्यान, पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपाधीक्षक मिलिंद मोहिते, डीव्हायएसपी नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांच्या विरोधी पथकाने नाकाबंदी करत याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.