राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्वरित वक्तव्य मागे घ्या-उदयनराजे
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत हे वक्तव्य राज्यपालांनी केलं त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. समर्थ रामदास नसते तर छत्रपती शिवरायांना कुणी विचारलं असतं? असं ते म्हणाले. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे यांनी एक व्हीडिओही ट्विट केला आहे. त्यामध्ये शरद पवार […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत हे वक्तव्य राज्यपालांनी केलं त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. समर्थ रामदास नसते तर छत्रपती शिवरायांना कुणी विचारलं असतं? असं ते म्हणाले. ज्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू केलं आहे. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे यांनी एक व्हीडिओही ट्विट केला आहे. त्यामध्ये शरद पवार हे सांगत आहेत की जिजामाताच शिवरायांच्या गुरू होत्या. तसंच कोर्टाची कागदपत्रंही त्यांनी सादर केली.
त्यानंतर आता खासदार उदयनराजे भोसले यांनीही फेसबुक पोस्ट लिहून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं अशी मागणी केली आहे. राज्यपालांनी त्यांचं वक्तव्य मागे घ्यावे अशीही मागणी केली.
काय म्हणाले आहेत उदयनराजे फेसबुक पोस्टमध्ये?
राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून चुकिचा इतिहास सांगितला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवे होते. त्यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.