एकनाथ शिंदेंचं बंड : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस-अमित शाहांना फोन, दहा दिवसांत काय घडलं?

मुंबई तक

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि पक्ष वाचवण्यासाठी भाजपच्या राज्यातील नेतृत्वापासून ते दिल्लीपर्यंत फोनाफोनी केल्याची मोठी माहिती आता समोर आलीये. एकनाथ शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली. २१ […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि पक्ष वाचवण्यासाठी भाजपच्या राज्यातील नेतृत्वापासून ते दिल्लीपर्यंत फोनाफोनी केल्याची मोठी माहिती आता समोर आलीये. एकनाथ शिंदे यांचं बंड मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली.

२१ जून २०२२. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निकालानंतरचा दुसरा दिवस. विजयाचा गुलाल खाली बसत नाही, तोच मोठी बातमी समोर झाली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील २६ आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत गाठलं.

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार?; शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उफाळून आलेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे तत्कालीन सरकार वाचवण्यासाठी आणि पक्षाची एकजूट कायम ठेवण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp