Uddhav Thackeray : ठाकरेंना धक्का! पक्ष फुटला आता पक्ष कार्यालयही गेलं!

मुंबई तक

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Office। Nagpur Political News : ठाकरेंची (Uddhav Thackeray) सत्ता गेली, शिवसेनाही (Shiv Sena) ताब्यात राहते की नाही, अशी परिस्थिती असतानाच आता नवा धक्का बसलाय. सत्तेसोबत पक्ष कार्यालयही (Party Office) ठाकरेंच्या ताब्यातून सुटलंय. पण या सगळ्यांमध्ये खास गोष्ट आहे, ती म्हणजे यात एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) काहीएक संबंध नाही. मग […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Office। Nagpur Political News : ठाकरेंची (Uddhav Thackeray) सत्ता गेली, शिवसेनाही (Shiv Sena) ताब्यात राहते की नाही, अशी परिस्थिती असतानाच आता नवा धक्का बसलाय. सत्तेसोबत पक्ष कार्यालयही (Party Office) ठाकरेंच्या ताब्यातून सुटलंय. पण या सगळ्यांमध्ये खास गोष्ट आहे, ती म्हणजे यात एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) काहीएक संबंध नाही. मग नेमकं काय घडलंय? ठाकरेंवर अशी वाईट परिस्थिती का ओढावलीय? ठाकरेंना पक्ष कार्यालय का रिकामं करावं लागलं? समजून घ्या प्रकरण काय आहे? (Uddhav Thackeray led Shiv Sena not paid rent of party office of nagpur)

गेल्या सात महिन्यांपासून ठाकरेंवर एकापाठोपाठ एक संकट येत आहेत. सात महिन्यांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व अशी उभी फूट पडली. त्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाकडे आलेलं मुख्यमंत्रीपद गेलं. आमदारांपाठोपाठ खासदारांनीही साथ सोडली. जी शिवसेना ठाकरेंची म्हणून ओळखली जायची, ती कोणाची असा वाद निर्माण झालाय. एवढं कमी म्हणून की काय आता ठाकरे गटावर पक्षाचं कार्यालयचं सोडण्याची वेळ आलीय.

ठाकरेंच्या शिवसेनेला जागा का करावी लागली रिकामी?

त्याचं झालं असं, की नागपूर ठाकरे गटाचं गणेशपेठ इथं कार्यालय आहे. इथूनच स्थानिक उमेदवारांना एबीफॉर्मचं वाटप केलं जायचं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आल्यावर या कार्यालयात गेले होते. पण तेच कार्यालय सोडण्याची नामुष्की ठाकरे गटावर ओढावलीय. वर्षभराचं भाडं आणि वीजबिल थकल्याने जागा मालक किशोर राय यांनी ठाकरे गटाला कार्यालय रिकामं करायला लावलं.

Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीत BJP कुणाच्या पाठिशी? काय ठरलं?