राड्यानंतर महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसवून आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रभादेवी येथे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिक आपापसात भिडले होते. यानंतर ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी महेश सावंत आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. शिवसैनिक हाच शिवसेनेचा ब्रह्मास्त्र आहे, असे कौतुकाचे बोल उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवले. तसेच यावेळी महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या जवळील खुर्चीवर बसवून आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये खाली बसलेले पाहायला मिळाले.

ADVERTISEMENT

मध्यरात्री दोन्ही गटात तुफान राडा झाल्यानंतर दादर पोलीस स्टेशनसमोर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होते. उद्धव ठाकरे यांच्या 25 समर्थकांनावर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली होती. ज्यामध्ये महेश सावंत यांचा देखील समावेश होता. यानंतर या सर्व शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावले होते. यावेळी त्यांनी महेश सावंत यांच्यासह इतर शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तसंच शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रह्मास्त्र असल्याचं ते म्हणाले.

आमच्या सयंमाचा बांध फुटला : महेश सावंत

गेल्या दोन महिन्यांपासून आम्हाला डिवचण्याचं प्रयत्न सरवणकर यांचे समर्थक करत होते. आम्ही तेव्हांपासून त्यांना आवरा, असं पोलिसांना सांगत होते. मात्र, ते काही शांत बसले नाही. ते आमच्या अंगावर आले आणि त्यात पोलीस देखील जखमी झाले. मग आम्ही त्यांना आमची ताकद दाखवून दिली. दोन महिने झाले ते आम्हाला डिवचत होते, मग आमच्या संयमाचा बांध फुटला, असं महेश सावंत म्हणाले. तसेच आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचं देखील सावंत यांनी बोलून दाखवलं.

हे वाचलं का?

गोळीबार केल्याच्या आरोपावर सदा सरवणकर यांचा खुलासा; शिवसेनेवरच केला आरोप

काय आहे प्रकरण?

गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी प्रभादेवी जंक्शन येथे शिंदे गटाच्यावतीने गणेश भक्तांसाठी पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता. त्याच्या शेजारी ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांनीही स्टॉल लावला होता. त्यावेळी दोघांमध्ये वादची ठिणगी पडली होती. त्यावेळी हा मिटवण्यात आला होता. मात्र, महेश सावंत यांनी राग मनात ठेवून रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हल्ला केला, असं महेश तेलवणे यांनी आपल्या तक्ररीत म्हटलं आहे. महेश सावंत यांच्याकडून देखील सरवणकर आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

शिंदे विरुद्ध शिवसेनेत संघर्षाची ठिणगी! सदा सरवणकर यांच्यासह ८ जणांवर गुन्हा

ADVERTISEMENT

कोण आहेत महेश सावंत?

महेश सावंत हे शिवसेनेचे शाखाप्रमुख आहेत. गेली अनेक वर्ष ते आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक होते. मात्र 2017 साली त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्यांच्याऐवजी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. महेश सावंत यांनी देखील समाधान सरवणकर यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली. या निवडणुकीत समाधान सरवणकर विजयी झाले होते, तर महेश सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तेव्हापासून दोघांमध्ये अधूनमधून वाद होतात. शनिवारी रात्रीही पुन्हा दोन्ही गट आपापसात भिडले.

आमदार सदा सरवणकरांनी खरचं गोळीबार केला का? सखोल चौकशी होणार…

25 जणांवर गुन्हा दाखल

शिवसेनेतील शिंदे-ठाकरे गटामध्ये मध्यरात्री प्रभादेवीमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्या फिर्यादीवरून दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेमधील कलम 143, 147, 148, 149, 395, 324, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दादर पोलिसांनी ठाकरे गटाचे शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यासह शैलेश माळी, संजय भगत आणि इतर दोघे अशा ५ जणांना अटक करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT