आईसक्रीम देऊन 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन हत्या, आरोपी उत्तर प्रदेशातून अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन त्याची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातील अलाहबादमधून अटक केली आहे. कांचनसिंग उर्फ कांचन ब्रिजराज पासी असं या आरोपीचं नाव आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कँप नंबर २ येथील हनुमान नगर परिसरात अमरसिंग ठाकूर हे पत्नी आणि ४ वर्षाच्या मुलासह राहत होते. 20 एप्रिल रोजी अमरसिंह यांचा मुलगा मंदिरासमोर खेळत असताना आरोपी कांचन तिकडे आला आणि त्याने मुलाला आईस्क्रीम देतो असं सांगत आपल्यासोबत घेऊन गेला. यानंतर अंबरनाथ येथील ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात आरोपीने मुलाचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह झुडपात लपवून ठेवत आरोपी उत्तर प्रदेशातील उस्मानपूर या त्याच्या मुळ गावी गेला.

दरम्यान, आपला मुलगा परत न आल्यामुळे चिंतेत पडलेल्या अमरसिंग ठाकूर यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मुलाची बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. ज्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

हे वाचलं का?

बीडमध्ये अस्वस्थ करणारी घटना! पुण्यातील महिलेवर नात्यातील तरुणांकडून सामूहिक बलात्कार

पोलिसांना तपासादरम्यान काही दिवसांपूर्वी अमरसिंग आणि कांचन यांच्यात भांडण झाल्याचं समजलं, ज्यावरुन पोलिसांचा पहिला संशय कांचनवर आला. आरोपी उत्तर प्रदेशला निघून गेल्याची माहिती कळताच उल्हासनगर पोलिसांचं एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झालं. पोलिसांनी अलाहबादजवळील एका छोट्या रेल्वे स्थानकाजवळ कांचनला अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असून पुढील तपासासाठी त्याला कोर्टाने 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT