उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा नेमका अर्थ समजून घ्या 10 मुद्द्यांमध्ये
मुंबई: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (22 जून) संध्याकाळी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांनी मला समोर येऊन सांगितलं तर मी स्वतः मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे. फक्त मुख्यमंत्री पदच नाही तर शिवसेनेचं पक्षप्रमुख सोडण्यास तयार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. जाणून घेऊयात उद्धव ठाकरे […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (22 जून) संध्याकाळी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांनी मला समोर येऊन सांगितलं तर मी स्वतः मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे. फक्त मुख्यमंत्री पदच नाही तर शिवसेनेचं पक्षप्रमुख सोडण्यास तयार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. जाणून घेऊयात उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाइव्हमधील 10 महत्त्वाचे मुद्दे.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे:
1. आम्ही बराच काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात होतो. पण महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना ज्या घडामोडी झाल्या त्यावेळी शरद पवारांनी मला बाजूला नेलं आणि म्हणाले की, जबाबदारी तुमच्या खांद्यावर द्यावी लागेल.
हे वाचलं का?
2. शरद पवारांनी त्यावेळी मला मुख्यमंत्री व्हायला सांगितले. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सांगितलं तर मी तत्काळ राजीनामा देण्यास तयार आहे.
3. सोनिया गांधींनीही आपल्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आज सकाळी कमलनाथ यांनी मला फोन केला आणि सांगितले की आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
ADVERTISEMENT
4. भाजप आपल्यासोबत कशी वागत आली आहे हे आपल्याला माहिती आहे. मी मुख्यमंत्री म्हणवून घेण्यास योग्य नाही, असे ते लोकं म्हणत आहेत.
ADVERTISEMENT
5. मला मुख्यमंत्रीपद सोडायला काहीच हरकत नाही, माझ्या जागी कोणी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंदच होईल.
6. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक आवाहन देखील केलं.
7. मी राजीनामा द्यायला तयार आहे, मला कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही, मी कोणावरही अवलंबून नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
8. बंडखोर आमदारांसाठी सीएम ठाकरे म्हणाले की, जे नाराज आमदार आहेत त्यांनी इथं यावं आणि मला सांगावं मी खुर्ची सोडायला तयार आहे.
‘मुख्यमंत्री पदच काय.. शिवसेनेचं पक्षप्रमुख पद पण सोडतो’, उद्धव ठाकरे गहिवरले
9. हे माझे नाटक नाही. मी एका क्षणात मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. कोणाकडे किती आकडा आहे याची मला पर्वा नाही.
10. गुवाहाटीला गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना मी स्वतःचे समजतो, जे गुवाहाटीला गेले आहेत त्यांनी माझ्याशी येऊन बोलावं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT