कडबा कटिंग मशीनमध्ये केस अडकून नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

स्मिता शिंदे, आंबेगाव पुणे लग्नाला अवघे सहा महिने झालेले असताना जनावरांचे खाद्य कापण्याच्या कडबा कुट्टी मशीन मध्ये चारा कापण्याचे काम करताना केस अडकून एका 21 वर्षीय नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे घडली आहे. सोनाली अजय दौंड असं मृत नवविवाहितेचे नाव आहे. जनावरांना चारा कटींग करून घालण्याच्या कुट्टी मशीनमध्ये सोनालीच्या गळ्यातील स्कार्फ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

स्मिता शिंदे, आंबेगाव पुणे

लग्नाला अवघे सहा महिने झालेले असताना जनावरांचे खाद्य कापण्याच्या कडबा कुट्टी मशीन मध्ये चारा कापण्याचे काम करताना केस अडकून एका 21 वर्षीय नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे घडली आहे. सोनाली अजय दौंड असं मृत नवविवाहितेचे नाव आहे.

जनावरांना चारा कटींग करून घालण्याच्या कुट्टी मशीनमध्ये सोनालीच्या गळ्यातील स्कार्फ आणि केस गुंतल्याने सोनालीला अचानक गळफास लागल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोनालीचे नुकतेच सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्यामुळे या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनालीचे सासरे सुभाष सोपान दौंड (वय 42 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. लाखणगांव गव्हाळीमळा, ता. आंबेगांव, जि. पुणे) यांनी ही खबर नोंद केली आहे.

हे वाचलं का?