विमानातील प्रवाशासाठी भागवत कराड ठरले देवदूत; मोदींनी केलं तोंडभरून कौतुक
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड केलेल्या एका मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीही भारावून गेले. डॉ. कराड विमानातून प्रवास करत असताना एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला सारत त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांच्या या मदतीचं पंतप्रधान मोदींनीही ट्वीटवरून कौतुक केलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे इंडिगोच्या विमानातून दिल्लीवरून मुंबईला येत होते. विमान हवेत […]
ADVERTISEMENT

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड केलेल्या एका मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीही भारावून गेले. डॉ. कराड विमानातून प्रवास करत असताना एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला सारत त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांच्या या मदतीचं पंतप्रधान मोदींनीही ट्वीटवरून कौतुक केलं.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे इंडिगोच्या विमानातून दिल्लीवरून मुंबईला येत होते. विमान हवेत झेपावल्यानंतर तासाभराने विमानातील एका प्रवाशाची अचानक तब्येत बिघडली. त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने उद्घोषणा करत विमानात कुणी डॉक्टर आहे का? अशी विचारणा केली.
ही घोषणा ऐकून केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी तातडीने तब्येत बिघडलेल्या प्रवाशांच्या दिशेनं धाव घेतली. भागवत कराड सर्जन असून, त्यांनी तातडीने रुग्णावर प्राथमिक उपचार केले आणि विमानातील आपतकाळीन किटमधील औषधीही दिली. त्यामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले.
ही सर्व घटना मुंबईच्या दिशेनं येत असताना घडली. इंडिगोनं आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्वीट करत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भागवत कराड यांचे आभार मानले.