रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर; राष्ट्रवादी भूमिका बदलणार?
Ramdas Athawale News : बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागालँडमध्ये (Nagaland) जसा पाठिंबा दिला तसा केंद्रात पंतप्रधान मोदी (Modi Government) यांच्या सरकारलाही पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्या सोबत असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं आणि एनडीएमध्ये यावं अशी खुली ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले […]
ADVERTISEMENT

Ramdas Athawale News :
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागालँडमध्ये (Nagaland) जसा पाठिंबा दिला तसा केंद्रात पंतप्रधान मोदी (Modi Government) यांच्या सरकारलाही पाठिंबा द्यावा. आपल्यासारखा अनुभवी नेता आमच्या सोबत असला पाहिजे, त्यामुळे पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं आणि एनडीएमध्ये यावं अशी खुली ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पवारांना खुली दिली. (RPI(A) Chief Ramdas Athawale offer to NCP chief sharad pawar to support
धाराशिव जिल्हा दौऱ्यावर जाताना आठवले यांचं बीडमध्ये कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय. ५० फुटांचा हार, जेसीबी वरून फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी असं अत्यंत उत्साही वातावरणात आठवलेंचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील संघटनेच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला.
आठवले पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली असली तरी ती किती टिकेल हे सांगता येत नाही. प्रकाश आंबेडकर हे ठाकरेंसोबत गेले असले तरीही ते महाविकास आघाडी सरकारमध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे ते कुठेही गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.