हत्येच्या आरोपातील तरुणाचा भररस्त्यात खून, जळगावात भररस्त्यात थरार
भुसावळ तालुक्यातील नशिराबाद खुन खटल्यात जामिनावर सुटलेल्या एका संशयित आरोपीची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत. धम्मप्रिय सुरळकर असं या घटनेत मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेत धम्मप्रियचे वडील […]
ADVERTISEMENT
भुसावळ तालुक्यातील नशिराबाद खुन खटल्यात जामिनावर सुटलेल्या एका संशयित आरोपीची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजल्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
धम्मप्रिय सुरळकर असं या घटनेत मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेत धम्मप्रियचे वडील मनोहर सुरळकर जखमी झालेत. सुरळकर हे भुसावळ शहरातील पंचशील नगरातील रहिवासी आहेत. ते मंगळवारी सायंकाळी जळगावातून दुचाकीने भुसावळला घरी जात होते. यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर अचानकपणे सशस्त्र हल्ला केला. ज्यात धम्मप्रियचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2020 रोजी भुसावळ शहरातील पंचशील नगरात एका व्यक्तीचा खून झाला होता. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यात धम्मप्रिय सुरळकर हा संशयित आरोपी होता. त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तसेच तो जळगाव उपजिल्हा कारागृहात होता. मंगळवारीच त्याला भुसावळच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. कारागृहातून सुटल्यानंतर तो वडिलांसह दुचाकीने जळगावातून भुसावळच्या दिशेने जात असताना त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला.
हे वाचलं का?
नशिराबाद येथे महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाखाली धम्मप्रियवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला. त्यात जखमी झाल्याने दोघे जण दुचाकीवरून जमिनीवर पडले. मारेकऱ्यांनी नंतर धम्मप्रियवर चॉपरने वार करत त्याची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यांनी तपास सुरु केलाय.
धक्कादायक! नरबळीसाठी चेन्नईवरुन चार वर्षाच्या मुलाचं अपहरण, दोन आरोपी अटकेत; बालकाची सुटका
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT