लग्नसोहळ्यावर शोककळा, विहिरीत पडून 13 महिला आणि मुलींचा मृत्यू
लग्नसोहळा सुरू होता, सगळीकडे आनंदाचं वातवरण होतं. धमाल मस्ती सुरू होती… अशातच एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे लग्नसोहळ्यावर शोककळा पसरली. 13 महिला आणि मुलींचा विहीरीत पडून अंत झाला आहे. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी एकच खळबळ माजली आहे. या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. स्थानिक आणि इतर लोक या मदत आणि बचावकार्यात सहभागी झाले […]
ADVERTISEMENT

लग्नसोहळा सुरू होता, सगळीकडे आनंदाचं वातवरण होतं. धमाल मस्ती सुरू होती… अशातच एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे लग्नसोहळ्यावर शोककळा पसरली. 13 महिला आणि मुलींचा विहीरीत पडून अंत झाला आहे. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी एकच खळबळ माजली आहे. या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. स्थानिक आणि इतर लोक या मदत आणि बचावकार्यात सहभागी झाले आहेत.
उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर भागात रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.लग्नसोहळा जिथे सुरू होता त्याच ठिकाणी असलेल्या विहिरीत 12 हून अधिक मुली आणि महिला पडल्या. नेबुआ जिल्ह्यातील नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्कूल टोला भागातील एका घरात लग्न होतं. त्यामुळे इतर घरातील महिला आणि मुली लग्नघराजवळ असलेल्या विहीरीजवळ उभ्या होत्या. हळद लावण्याचा कार्यक्रम तेव्हा सुरू होता. अशात विहिरीची लोखंडी जाळी तुटली आणि 12 पेक्षा जास्त महिला आणि मुली या विहिरीत पडल्या. या घटनेत 13 जणींचा मृत्यू झाला आहे.
नौरंगिया टोला गांव में एक पुराना कुआं था जो स्लैप से ढका था। पूजा-पाठ के दौरान बच्चे और महिलाएं उसके ऊपर बैठे हुए थे, इस दौरान स्लैप नीचे चला गया और मलबा उनके ऊपर गिर गया: एस. राजलिंगम, DM, कुशीनगर, उत्तर प्रदेश pic.twitter.com/DXfaykz56T
— ANI_HindiNews (@AHindinews) February 16, 2022
कुशीनगरचे जिल्हा दंडाधिकारी एस. राजलिंगम यांनी या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितलं की, “अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.” ते म्हणाले, “नौरंगिया टोला गावात एक जुनी विहीर होती, जिच्यावर स्लॅब होता. त्या स्लॅबवर लग्नसोहळ्या दरम्यान लहान मुली आणि महिला बसल्या होत्या, त्या दरम्यान स्लॅब कोसळला आणि मलबा त्यांच्यावर पडला. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
ही धक्कादायक घटना घडली तेव्हा तातडीने पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर स्थानिकांनी बचावकार्यही सुरू केलं. या घटनेत 13 मुली आणि महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी घटना घडली तिथे आता गावकऱ्यांची गर्दी झाली आहे. तसंच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.










