Urfi: ‘मेरी डिपी इतनी ढासू.. चित्रा मेरी सासू’, चित्रा वाघांना डिवचलं

मुंबई तक

Urfi Javed DP and Tweet: मुंबई: भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांवर आक्षेप घेतला आणि दोघींमध्ये वाद सुरू झाला. काही दिवसांपासून दोघींमध्येही तू-तू मैं-मैं सुरू आहे. आता मात्र उर्फीनं हद्दच केली आहे. कारण एक ट्विट (Tweet) करत उर्फीने थेट चित्रा वाघ यांच्यासोबत नातं जोडत त्यांना डिवचलं आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Urfi Javed DP and Tweet: मुंबई: भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी अभिनेत्री उर्फी जावेदच्या (Urfi Javed) कपड्यांवर आक्षेप घेतला आणि दोघींमध्ये वाद सुरू झाला. काही दिवसांपासून दोघींमध्येही तू-तू मैं-मैं सुरू आहे. आता मात्र उर्फीनं हद्दच केली आहे. कारण एक ट्विट (Tweet) करत उर्फीने थेट चित्रा वाघ यांच्यासोबत नातं जोडत त्यांना डिवचलं आहे. जाणून घ्या उर्फी नेमकी काय म्हणाली? (urfi javed has again criticized chitra wagh by tweeting)

चित्रा वाघ यांनी उर्फी वादात राज्य महिला आयोगाला ओढलं. त्यानंतर रुपाली चाकणकरांनीही थेट चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फीच्या नाद सोडावा, असा सल्लाही अनेक नेटकऱ्यांनी चित्रा वाघ यांना दिला. पण, चित्रा वाघ अजूनही आपल्या मुद्द्यांवर ठाम आहेत.

तुळजापुरातही त्यांनी उर्फीला धडा शिकवणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता परत उर्फीनं नवीन ट्विट केलं.

उर्फीनं ट्विटरवर सलवार सूटमधला फोटो टाकला. तिच्या पहिल्या ट्विटमध्ये ती म्हणाली की, ‘चित्रा वाघ ने मुझे सुधार दिया…लव्ह यू बेस्टी…’

हे वाचलं का?

    follow whatsapp