Vasai : भयंकर… वाहतूक पोलिसाला नेलं फरफटत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

वसईमधील वसंत नगरी सिग्नलवर एक धक्कादायक घटना घडली आहे. CCTV कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

हे वाचलं का?

वसईत वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी रविवारी (12 जानेवारी) संध्याकाळी ड्युटीवर होते.

ADVERTISEMENT

यावेळी सिग्नल तोडणार्‍या वाहन चालकाला चौधरी यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

गाडी थांबविण्याच्या प्रयत्नात वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी गाडीच्या बोनेटवर पडले तरी, वाहनचालकाने भरधाव वेगाने गाडी पुढे नेली.

वाहन चालकाने वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी यांना अक्षरश: फरफटत नेलं.

जवळजवळ दीड किलोमीटर चौधरी कारच्या बोनेटवरच होते.

दरम्यान, पुढे जाऊन वाहनांच्या गर्दीमुळे गाडी थांबली आणि चौधरी यांची सुटका झाली.

सोमनाथ चौधरी हे या प्रकारात जखमी झाले असून थोडक्यात बचावले आहेत.

याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी वाहन चालक जाफर सिद्दीकी याला अटक केली आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT