वीणा जगतापनेही सोडली ‘आई माझी काळूबाई’ मालिका, हे आहे कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आई माझी काळूबाई ही मालिका कमी काळातच लोकांच्या पसंतीस उतरली. तर अभिनेत्री वीणा जगताप हिने अचानक ही सिरीयल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वीणा जगताप या मालिकेत आर्याची भूमिका साकारत होती. सिरीलयलमधून वीणाने एक्झिट घेतल्यानंतर आता नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.

ADVERTISEMENT

तब्येतीच्या कारणाने वीणा जगतापने ही मालिका सोडली असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वीच वीणाने ही मालिका करण्यात सुरुवात केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून वीणा तब्येत बरी नव्हती. शूटींगच्या बीझी शेड्यूलमधून तिची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे वीणाने मालिका सोडण्याचा मोठा निर्णय घेतलाय.

दरम्यान वीणा जपतापच्या जागी अभिनेत्री रश्मी अनपट आता आर्याची भूमिका साकारणार आहे. रश्मीने यापूर्वी अग्निहोत्र २ तसंच कुलस्वामिनी या मालिकांमध्ये काम केलं आहे. आजपासून या मालिकेतमध्ये रश्मी आर्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मीला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

हे वाचलं का?

या मालिकेची कथा ही काळूबाईच्या भक्तीची त्याचप्रमाणे शक्तीची आहे. आई माझी काळूबाई मालिका सुरु झाली त्यावेळी आर्याची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने केली होती. मात्र प्राजक्ताने प्रोडक्शनसोबत वाद झाल्याचं समोर आलं होतं. हे वाद वाढल्यानंतर प्राजक्ताने मालिका सोडून दिली. त्यानंतर वीणा जगतापने ही मालिका केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT