चित्रपटामुळे तेढ निर्माण होऊ नये! द काश्मीर फाईल सिनेमावरील चर्चांवर नाना पाटेकरांचं परखड मत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘द काश्मीर फाईल’ या सिनेमावरुन गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात चर्चा आणि वाद रंगताना दिसत आहेत. काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगणाऱ्या या सिनेमाला टॅक्स फ्री घोषित करण्यात यावं यावरुनही राजकराण सुरु झालं आहे. महाराष्ट्रात तर झुंज, पावनखिंड आणि काश्मीर फाईल्स या सिनेमांवरुन सोशल मीडियावर गटातटाचं राजकारण रंगताना पहायला मिळतंय. या सर्व परिस्थितीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपलं परखड मत मांडलं आहे.

चित्रपट जसा आहे तसा पाहा, त्यातली वस्तुस्थिती काहींना पटेल तर काहींना नाही. त्यामुळ गट-तट पडणं स्वाभाविक असलं तरीही त्यातून तेढ निर्माण व्हायला नको असं नाना पाटेकर म्हणले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

इथले हिंदू-मुस्लीम इथलेच आहेत आणि त्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. ‘द काश्मीर फाईल’ हा सिनेमा मी पाहिलेला नाही त्यामुळे मला त्यावर बोलता येणार नाही. परंतू एखाद्या चित्रपटावरुन कॉन्ट्रोवर्सी होणं बरं नाही. जी लोकं तेढ निर्माण करतात त्यांना ठामपणे प्रश्न विचारायला हवेत. सगळंकाही छान सुरु असताना मध्येच कोणीतरी बिब्बा घालण्याचा प्रयत्न करतो. चित्रपट जसा आहे तसा तो पहावा. त्यातील वस्तुस्थिती काहींना पटेल तर काहींना पटणार नाही. त्यामुळे गटतट पडणं स्वाभाविक असलं तरीही त्यातून तेढ निर्माण होता कमा नये, असं नाना पाटेकर म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आपल्या लोकांना आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे पटतच नाही. अनेकदा याचा फायदा घेऊन काही लोकं आपली पोळी भाजून घेतात. आपण भारतीय आहोत त्यामुळे तुमची जात-धर्म हे घरी ठेवावंत. आपली लोकं परदेशात गेली की त्यांना आपण भारतीय आहोत हे आठवत पण मग इथे परत आल्यानंतर त्यांना जात आणि धर्म कसे आठवतात असाही परखड सवाल नाना पाटेकर यांनी विचारला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT