Lata Mangeshkar Health : आशा भोसले, रश्मी ठाकरेंसह अनेक मान्यवर भेटीसाठी रुग्णालयात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनावर मात करून घरी परतलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी सायंकाळी त्यांच्या भगिणी आशा भोसले, रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात धाव घेतली.

ADVERTISEMENT

लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी निमोनिया झाल्याचं निदान झालं होतं. निमोनिया झाल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याचवेळी त्यांना कोरोनाचीही लक्षणं जाणवली होती. त्यामुळे चाचणी करण्यात आली. चाचणीतून कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.

औषधोपचराच्या मदतीने लता मंगेशकरांनी कोरोनावर मात केली. तब्येत सुधारल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देेण्यात आली होती. मात्र, शनिवारी अचानक लता मंगेशकर यांची

हे वाचलं का?

प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

लता मंगेशकरांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर शनिवारी सायंकाळी अनेक मान्यवर त्यांच्या प्रकृतीबद्दल चौकशीसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले. गायिका आशा भोसले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, चित्रपट दिग्दर्शक मधूर भंडारकर, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर रुग्णालयात आले.

ADVERTISEMENT

डॉक्टरांनी काय म्हटलंय?

‘लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून आम्ही त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीवर, तसेच त्या उपचारांना कसा प्रतिसाद देत आहेत, यावर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे,’ अशी माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी ANI शी बोलताना दिली आहे.

27 जानेवारीला त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती समोर आली होती. तेव्हा त्या उपचारांना प्रतिसाद देत होत्या आणि त्यांची प्रकृती चांगली होती असं डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगतिलं होतं. त्यांना आणल्या दिवसापासून ICU मध्येच ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्यांना आराम मिळावा म्हणून डॉक्टरांची एक टीम सातत्याने प्रयत्न करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT