चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढणार? पीडित मुलीने कुचिक यांच्यावरील आरोप मागे घेतले
पुण्यातील शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार आणि गर्भपात करायला लावल्याचे आरोप केलेल्या मुलीने आता त्यांच्यावरील आरोप मागे घेतले आहेत. पीडित मुलीने आज पुणे न्यायालयात मॅजिस्ट्रेटसमोर Section 164 crpc प्रमाणे पुन्हा एकदा जबाब नोंदवला. यात पीडित मुलीने रघुनाथ कुचिक यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि त्यांच्या माणसांनी मला दमदाटी करत […]
ADVERTISEMENT
पुण्यातील शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार आणि गर्भपात करायला लावल्याचे आरोप केलेल्या मुलीने आता त्यांच्यावरील आरोप मागे घेतले आहेत. पीडित मुलीने आज पुणे न्यायालयात मॅजिस्ट्रेटसमोर Section 164 crpc प्रमाणे पुन्हा एकदा जबाब नोंदवला. यात पीडित मुलीने रघुनाथ कुचिक यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि त्यांच्या माणसांनी मला दमदाटी करत कुचिक यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यास भाग पाडलं असं या पीडित तरुणीने सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
पीडित तरुणीने हा जबाब नोंदवल्यानंतर पुणे पोलीस आता या प्रकरणाचा नव्याने तपास करणार असून यात चित्रा वाघ यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रघुनाथ कुचिक यांनी पीडिताला कधीच आत्महत्या करायला सांगितले नव्हते, असा व्हाट्सएप्प मेसेज सुद्धा कुचिक यांनी कधी केला नसताना चित्रा वाघ यांच्या माणसांनी आपल्याला असे मेसेज आल्याचं पोलीस आणि मीडियाला सांगायला भाग पाडलं असं या पीडित तरुणीने सांगितलं आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या अपहरणाचा कट रचत, रघुनाथ कुचिक यांच्या माणसांनी आपल्याला गोव्याला नेत दबाव टाकत केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला असं सांगायला भाग पाडल्याचंही पीडित तरुणीने मॅजिस्ट्रेटसमोर सांगितलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या प्रकरणाला आता नवीन ट्विस्ट मिळाला आहे. दरम्यान, रघुनाथ कुचिक यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी या प्रकरणात चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे.
हे वाचलं का?
शिवसेना नेता रघुनाथ कुचिक बलात्कारपिडीतेने काल माझ्यावर आरोप केले कि चित्रा वाघ यांनीचं हे सगळं घडवून आणलं..
आणि
आज सकाळीचं कुचिकचे वकील हर्षद निंबाळकर यांची मला नोटीस आली
तर
दुसरीकडे चित्रा वाघ वर कसा गुन्हा दाखल करता येईल यावर खलबतं सुरूहेत…हा सगळा निव्वळ योगायोग नाही का ? pic.twitter.com/3SUV2CQYI7
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 13, 2022
काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेने कुचिक यांच्यावर आरोप करताना पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पुणे पोलिसांनी या तक्रारीवरुन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कुचिक यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर पीडित तरुणीने आपल्या फेसबूक प्रोफाईलवर आत्महत्या करत असल्याचा एक व्हिडीओ टाकला होता. परंतू पुणे पोलिसांनी यात वेळेतेच मध्यस्थी करुन तिला अनुचित पाऊल उचलण्यापासून थांबवलं. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT