‘जागा आणि वेळ सांगा मी हजर असेन’; विक्रम ठाकरेंनी आमदार देवेंद्र भुयारांविरोधात थोपटले दंड
अमरावतीतल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक झाली. निवडणूक चर्चेत आली ती दोन गटात झालेल्या धक्काबुक्कीमुळे. निवडणुकीत झालेल्या या प्रकारावरून आमदार शिवाजी भुयार यांनी तलवारीनं हात छाटण्याचा इशारा दिला. भुयारांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर युवक काँग्रेसचे माजी महासचिव विक्रम ठाकरेंनीही दंड थोपटलेत. अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्याला राम लकेंसह एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती होती. यावेळी मोर्शी विधानसभा […]
ADVERTISEMENT
अमरावतीतल्या शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक झाली. निवडणूक चर्चेत आली ती दोन गटात झालेल्या धक्काबुक्कीमुळे. निवडणुकीत झालेल्या या प्रकारावरून आमदार शिवाजी भुयार यांनी तलवारीनं हात छाटण्याचा इशारा दिला. भुयारांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर युवक काँग्रेसचे माजी महासचिव विक्रम ठाकरेंनीही दंड थोपटलेत.
ADVERTISEMENT
अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्याला राम लकेंसह एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती होती. यावेळी मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार मेळाव्याला हजर होते.
देवेंद्र भुयारांनी या मेळाव्यात केलेल्या विधानावरून आता युवक काँग्रेस आक्रमक झालीये. आमदार देवेंद्र भुयारांच्या विधानावर बोट ठेवत युवक काँग्रेसनं थेट पोलीस ठाण्यात तक्रार केलीये. इतकंच नाही, तर विक्रम ठाकरेंनी “जागा तुझी, वेळ तुझा… सांग मी हजर असेन”, भुयारांनाही उलट आव्हान दिलंय.
हे वाचलं का?
विक्रम ठाकरे देवेंद्र भुयार यांना म्हणाले की, “माझं तुला आव्हान आहे. मी केदार चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ येतो. जुना देवेंद्र भुयार काय आहे ते दाखव”, असं प्रतिआव्हान ठाकरेंनी दिलंय. त्यामुळे स्थानिक राजकारण चांगलंच तापलंय.
‘तलवारीने हात छाटणार’, देवेंद्र भुयारांविरोधातील तक्रारीत काय?
युवक काँग्रेसच्या वतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, ‘२१ ऑक्टोबर २०२२ रोजी मराठी विद्यामंदिराच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा संपन्न जाला. त्या मेळाव्यात गैर अर्जदाराने (देवेंद्र भुयार) भाषण देताना प्रक्षोभक आणि भडकावू भाषण केलं. तलवारीनं हात छाटण्याची जाहीर धमकी दिली. ऐन सणासुदीच्या दिवसात मोर्शी वरूड मतदार संघात असलेली शांतता आणि सुव्यवस्था संपवण्याचा प्रयत्न करून जनतेमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने भाषण केले. गैर अर्जदार गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गु्न्हे दाखल करून योग्य कारवाई करावी”, अशी मागणी युवक काँग्रेसनं केलीये.
ADVERTISEMENT
देवेंद्र भुयार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात देवेंद्र भुयार म्हणाले होते की, “मुंबईच्या ठाकरेंची दहशत कालही होती. आजही आहे आणि उद्याही राहिल. पण, तुमची दहशत नदीच्या काठापर्यंत. आमच्या नादाला लागायचं नाही. हर्षवर्धन दादाच्या नादाला तर बिलकुलच लागायचं नाही. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला धक्का लावलात, तर तलवारीनं हात छाटल्याशिवाय राहणार नाही”, असं विधान देवेंद्र भुयार यांनी केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT