एकनाथ शिंदेंवर टीका करताना खासदार विनायक राऊतांचा तोल सुटला, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान टीका केली जात असल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते शिंदे गटाला लक्ष्य करत आहेत. तर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं जातंय. शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा कलगीतुरा सुरू असताना आता शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी वादग्रस्त विधान केलंय.

ADVERTISEMENT

दहिसरमध्ये झालेल्या कार्यक्रमात विनायक राऊत शनिवारी बोलत होते. याच कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर टीका केली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिमटा काढला.

विनायक राऊतांनी काय केलं वादग्रस्त विधान?

विनायक राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं. शिवसेना संपवायची. शिवसेना नाव पुसून टाकायचं. भ#### करणाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचा शिवसेना संपवण्याचा धंदा आहे ना, तो उधळून टाकून ही शिवसेना केवळ बाळासाहेबांची आहे. उद्धव ठाकरेंची आहे. तुमच्या बापजाद्यांची कधी होऊच शकत नाही. हे दाखवून देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल.’

हे वाचलं का?

Ramdas Kadam : ‘अरे आदित्य खरा गद्दार तू आहेस, काका म्हणून पाठीत खंजीर खुपसला’

‘देवेंद्र फडणवीसांचं दुर्दैवी… त्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागतेय’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना विनायक राऊतांनी त्यांचं शिक्षण काढलं. त्यांच्या शिक्षणावरून राऊतांनी देवेंद्र फडणवीसांनाही चिमटा काढला. ‘उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रोजेक्ट हा गुजरातला पाठवण्याचं पाप, हे या शिंदे सरकारने केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस तुमचा जर अभ्यास कमी असेल… खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसांसारख्या हुशार आणि अभ्यासू माणसाला… कदाचित दुर्दैव आहे बिचाऱ्याचं. वाईट दिवस आलेले आहेत. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या आडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतंय’, असं राऊत म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

उद्धवजींना म्हणालो, हे करू नका बाळासाहेबांच्या आत्माला शांती लाभणार नाही -रामदास कदम

ADVERTISEMENT

मुंबईतील मराठी माणसाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिदेंनी थेट उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्याला विनायक राऊत यांनी उत्तर दिलंय. ‘एकनाथ शिंदेंना आता आठवण झाली. म्हणे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला. आता कळायला लागलं. तसं अक्कल तर #### आहे, त्यांची. आता मराठी माणूस आठवतोय. ते सुद्धा कुठे गुवाहाटीला जाऊन, गुजरातला जाऊन, सुरतला जाऊन’, असा टोला राऊतांनी शिंदेंना लगावला.

शितल म्हात्रे विनायक राऊतांच्या आरोपावर काय म्हणाल्या?

शिंदे गटाकडून राऊतांच्या टीकेला उत्तर देण्यात आलंय. शिंदे गटातील शितल म्हात्रे यांनी राऊतांना उलट सवाल केलाय. ‘विनायक राऊत हे वयाने आणि अनुभवाने श्रेष्ठ आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या ४० आमदारांना शिवीगाळ करावी. खरंतर आपल्याला माहिती नसेल, राऊतसाहेब. आपले मुख्यमंत्री पदवीधर आहेत. बीए आहेत. सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं यात फरक असतो. मला सांगायला आवडेल की, आपले मुख्यमंत्री सुशिक्षित आणि सुसंस्कृत दोन्ही आहेत. आपल्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच आपली जीभसुद्धा सरकलीये का?’, असं शितल म्हात्रेंनी म्हटलंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT