Maharashtra Violenc: दोषींवर कठोर कारवाई करणार; गृहमंत्र्यांचा हिंसा करणाऱ्यांना इशारा
त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यातील काही शहरांत बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान, अमरावती, नांदेड आणि मालेगावात बंदला हिंसक वळण लागलं. तिन्ही शहरांत दगडफेक करण्यात आली. सध्या अमरावती वगळता नांदेड, मालेगावात दुसऱ्या दिवशी शांतता असून, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ‘त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या […]
ADVERTISEMENT

त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यातील काही शहरांत बंद पुकारण्यात आला होता. दरम्यान, अमरावती, नांदेड आणि मालेगावात बंदला हिंसक वळण लागलं. तिन्ही शहरांत दगडफेक करण्यात आली. सध्या अमरावती वगळता नांदेड, मालेगावात दुसऱ्या दिवशी शांतता असून, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
‘त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावं’, असं निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केलं. ‘राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा’, असं कळकळीचं आवाहन गृहमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे.
‘यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल’, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.