Gram Panchayat Election : 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 74 टक्के मतदान; कोण उधळणार गुलाल? धाकधूक वाढली…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : राज्यात रविवारी (18 डिसेंबर) 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान पार पडलं, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडलं. दरम्यान, या मतदानाचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

ADVERTISEMENT

राज्य निवडणूक आयोगानं ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच तर उर्वरित भागात संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ होती.

20 डिसेंबरला कोण उधळणार गुलाल?

ग्रामपंचायत निवडणुका या पॅनल पद्धतीने होत असल्या तरीही राज्यातील ग्रामीण भागात आपलं वर्चस्व कायम राहावं यासाठी सर्वच प्रमुख पक्ष हे उमेदवार आणि कसोशीनं प्रयत्न करतात. आता हा प्रयत्न कितपत यशस्वी होणार हे येत्या 20 डिसेंबरला कळून येणार आहे. मतदानानंतर आता या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यात कोण गुलाल उधळणार, नेमकं कोणाचं वर्चस्व कायम राहणार आणि कोण पराभूत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :

  • ठाणे – 35

  • पालघर – 62

  • ADVERTISEMENT

  • रायगड – 191

  • ADVERTISEMENT

  • रत्नागिरी – 163

  • सिंधुदुर्ग – 291

  • नाशिक – 188

  • धुळे – 118

  • जळगाव – 122

  • अहमदनगर – 195

  • नंदुरबार – 117

  • पुणे – 176,

  • सोलापूर – 169

  • सातारा – 259

  • सांगली – 416

  • कोल्हापूर – 429

  • औरंगाबाद – 208

  • बीड – 671

  • नांदेड – 160

  • उस्मानाबाद- 165

  • परभणी – 119

  • जालना – 254

  • लातूर – 338

  • हिंगोली – 61

  • अमरावती – 252

  • अकोला – 265

  • यवतमाळ – 93

  • बुलडाणा – 261

  • वाशीम – 280

  • नागपूर – 234

  • वर्धा – 111

  • चंद्रपूर – 58

  • भंडारा – 304

  • गोंदिया – 345

  • गडचिरोली- 25

  • एकूण – 7,135

  • ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT