हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला आजन्म कारावासाची शिक्षा
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळेला जलदगती न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. वर्धा जिल्हा न्यायालयात आज या खटल्याची सुनावणी झाली. पीडित तरुणी अंकीतावर विकेशने एकतर्फी प्रेमातून रॉकेल टाकत पेटवून दिलं होतं. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली. न्यायालयाने विकेशला बुधवारी झालेल्या सुनावणीमध्येच दोषी ठरवलं […]
ADVERTISEMENT
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणात आरोपी विकेश नगराळेला जलदगती न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. वर्धा जिल्हा न्यायालयात आज या खटल्याची सुनावणी झाली. पीडित तरुणी अंकीतावर विकेशने एकतर्फी प्रेमातून रॉकेल टाकत पेटवून दिलं होतं.
ADVERTISEMENT
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली. न्यायालयाने विकेशला बुधवारी झालेल्या सुनावणीमध्येच दोषी ठरवलं होतं. सरकारी पक्षातर्फे विकेशला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतू आरोपीच्या वकीलांनी पोलीस तपासातील काही त्रुटी कोर्टासमोर मांडल्या ज्यानंतर आज पाच वाजता निकाल सुनावताना न्यायालयाने आरोपी विकेशला ५ हजार रुपये दंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पोलिसांनी ४२६ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. खटला दाखल झाल्यानंतर जलदगती न्यायालयासमोर ६४ सुनावण्या झाल्या. यात २९ साक्षीदारांचे प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आलेले आहेत.
३ फेब्रुवारी २०२० रोजी काय घडलं?
हे वाचलं का?
मयत अंकिता पिसुड्डे हिंगणघाट येथील स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र या विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. अंकिता आणि आरोपी विकेश नगराळे हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावात रहिवासी होते.
३ फेब्रुवारी २०२० रोजी अंकिता महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडली. गावातून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून ती कॉलेजच्या दिशेने निघाली होती. महाविद्यालयात जात असतानाच रस्त्यात आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. अंकिताच्या जीवावर उठलेल्या विकेशने आधीच बाटलीमध्ये पेट्रोल भरून ठेवलं होतं. अंकिता दिसताच विकेशने दुचाकीतून काढलेलं पेट्रोल तिच्या अंगावर ओतले आणि तिला पेटवून दिले.
ADVERTISEMENT
त्यात अंकिता ४० टक्के होरपळली. तिला तातडीने नागपूमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज आठवडाभरानंतर संपली. १० फेब्रुवारी रोजी अंकिताने अखेरचा श्वास घेतला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT