भाजपचे मंत्री बसतात मग आमचे मंत्री का ठाण मांडून बसले नाहीत? – दीपक केसरकरांनी बोलून दाखवली खंत
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचं कडवं आव्हान मोडून काढत केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पॅनलने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. १९ जागांपैकी ११ जागांवर राणेंच्या पॅनलने विजय मिळवत पुन्हा एकदा बँकेवर सत्ता मिळवली आहे. या पराभवानंतर आता शिवसेनेतली खदखद पहिल्यांदा प्रकर्षाने समोर आली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी जर नारायण राणे जिल्ह्यात ठाण मांडून बसत असतील, भाजप त्यांना […]
ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचं कडवं आव्हान मोडून काढत केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पॅनलने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. १९ जागांपैकी ११ जागांवर राणेंच्या पॅनलने विजय मिळवत पुन्हा एकदा बँकेवर सत्ता मिळवली आहे. या पराभवानंतर आता शिवसेनेतली खदखद पहिल्यांदा प्रकर्षाने समोर आली आहे.
बँकेच्या निवडणुकीसाठी जर नारायण राणे जिल्ह्यात ठाण मांडून बसत असतील, भाजप त्यांना कुमक पाठवत असेल तर आमचे मंत्रीही इथे ठाण मांडून बसायला हवे होते असं मत सावंतवाडीचे शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी मांडलं आहे.
राणेंची साथ सोडून महाविकास आघाडीच्या गोटात दाखल, चर्चेत राहिलेले सतिश सावंत चिठ्ठीवर पराभूत
निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आम्ही नक्कीच आत्मचिंतन करु. परंतू हा धनशक्तीचा विजय झालेला आहे. आम्हाला पडलेली मतं ही २९१७ आहेत तर त्यांना २८११…यावरुन तुम्हाला अंदाज बांधता येईलच. सावंतवाडीत एका हॉटेलसमोर जेव्हा जास्त गाड्या उभ्या राहिलेल्या दिसल्या त्यावेळी मी पोलिसांना याची माहिती दिली. परंतू पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणत केसरकरांनी राणेंच्या पॅनलवर टीका केली.