Shambhuraj Desai:राष्ट्रवादी काँग्रेसला पुढची १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिवाळीच्या पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या घरी दिवाळी साजरी करण्यात आली पर्यावरणपुरक अशा या दिवाळी ला शंभुराज देसाई यांच्या पत्नी यांनी त्यांच औक्षण केलं. या वेळी शंभुराज देसाई यांनी शिंदे सरकारची ही पहिलीच दिवाळी असल्याचं सांगत शेतक-यांना ओल्या दुष्काळामुळं मोठा‌ फटका बसला आहे. मात्र सरकारनं याची पाहणी करुन मदत करण्याचं धोरण हाती घेतलंय असं सांगितलं आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काय म्हणाले शंभूराज देसाई?

जे शेतकरी निकषात बसत नाहीत त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल या बाबत विचार केला गेलाय तसंच हा महाराष्ट्र उज्वल महाराष्ट्र व्हावा हा महाराष्ट्र देशात नंबर एक असावा असा प्रयत्न कायम राहणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावुन आम्ही करत आहोत मात्र उद्धव ठाकरे ओल्या दुष्काळी दौ-यांवरुन आमच्यावर टीका करत आहेत.

उद्धव ठाकरेंनी २४ मिनिटांचा दुष्काळ दौरा केला

उद्धव ठाकरेंनी अवघ्या २४ मिनीटांचा दुष्काळ दौरा केला. आधी बोलणाऱ्यांनी त्यांच्यावर बोलावं मग आमच्याबद्दल बोलावं असाही टोला पाहावा नंतर आमच्या बद्दल बोलावं अशी टिका शंभूराज देसाई यांनी या प्रसंगी केली असून रामराजे हे विधान परिषदेचे माजी सभापती आहे परंतू तुमचं सरकार असताना लोकशाही राहिली आणि आमचं सरकार असताना ती संपली असं असू शकत नाही.

हे वाचलं का?

राष्ट्रवादीला पुढची १५ वर्षे सत्तेत येऊ देणार नाही

रामराजेंची टीका ही उद्वेगातुन आहे खरं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी सत्तेपासुन जास्त काळ लांब राहु शकत नाही आणि याचमुळे त्यांची अगापाखड होतीये परंतु आम्ही राष्ट्रवादीला पुढील १५ वर्ष सत्तेत येऊ देणार नाही असा खणखणीत इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT