Raj Thackeray Pune: ..तर आम्ही शांत बसणार नाही, दगड आम्हालाही हातात धरता येतो: राज ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात (PUNE) पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. मशिदीवरील भोंग्यांचा (Loudspeakers) विषय हा धार्मिक प्रश्न नसून तो सामाजिक प्रश्न आहे असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. याचवेळी दिल्लीतील हनुमान जयंती मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीबाबत देखील राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली.

ADVERTISEMENT

‘आमच्याकडून मिरवणुका निघतात त्या मिरवणुका निघाल्यानंतर जर समजा त्याच्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही काय शांत बसणार नाही. आमचे हात काय बांधलेले नाही. दगड आम्हालाही हातात धरता येतो.’ अशी आक्रमक भूमिका यावेळी राज ठाकरे यांनी घेतली.

पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

‘मशिदीवरील लाऊड स्पीकर अनधिकृत, काढले का जात नाही?’

‘मला हेच समजत नाहीए की, सगळ्या मशिदीवरील लाऊड स्पीकर हे अनधिकृत आहेत ते काढले जात नाही. मग आमच्या मुलांनी केलेल्या गोष्टी या अनधिकृत तुम्ही कशा काय मानता?’

ADVERTISEMENT

‘जर ते शांतता भंग करत असतील तर अशा भोंग्यांना परमिट देऊ नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. याही पलीकडे जाऊन आपण स्वत: काही समजणार आहोत की नाही? मुस्लिम समाजाला देखील या गोष्टी समजल्या पाहिजेत. या देशापेक्षा तर यांचा धर्म काही मोठा होऊ शकत नाही. लोकांना या गोष्टीचा त्रास होतोय. याची त्यांना कल्पना येणं आवश्यक आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा लाऊड स्पीकरचा मुद्दा हाती घेतला.

ADVERTISEMENT

‘दगड आम्हालाही हातात धरता येतो’

‘आमचे हात काय बांधलेले आहेत का?.. मला हेच म्हणायचं आहे की, या सगळ्यामध्ये त्यावेळेला आमच्याकडून मिरवणुका निघतात त्या मिरवणुका निघाल्यानंतर जर समजा त्याच्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही काय शांत बसणार नाही. आमचे हात काय बांधलेले नाही. दगड आम्हालाही हातात धरता येतो. समोर जे कुठचं हत्यार असेल ते हत्यार आमच्या हातात घ्यायला लावू नका.’ असा एक इशाराच राज ठाकरेंनी यावेळी दिला.

‘मग आमच्या देखील आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरुन ऐकाव्या लागतील.’

‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून आमची सर्व बाजूने तयारी सुरु आहे. या महाराष्ट्रात किंवा देशात आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत. कोणत्याही प्रकारच्या हाणामाऱ्या नकोत. या देशातील, महाराष्ट्रातील कुठेही शांतता आम्हाला भंग करायची नाही. इच्छा देखील नाही.’

‘माणुसकीच्या नात्याने असं वाटतं की, मुस्लिम धर्मियांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. पण त्यांना जर वाटत असेल की, नाही अजान आम्ही लाऊडस्पीकरवरुनच ऐकवणार आहोत तर मग आमच्या देखील आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरुन ऐकाव्या लागतील.’ असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या दोन मोठ्या घोषणा

‘जशास तसं उत्तर देणं गरजेचं’

‘3 तारखेला… आता त्यांचा रमजान सुरु आहे त्यामुळे आता कुठचीही गोष्ट मला करायची नाहीए. कोणाला काही सांगायचं नाहीए. परंतु जर त्यांना 3 तारखेपर्यंत ते समजलं नाही, कळलं नाही आणि या देशातील कायद्यापेक्षा, देशातील सुप्रीम कोर्टापेक्षा या देशातील न्यायव्यस्थेपेक्षा जर स्वत:चा धर्म म्हणून यांना जास्त मोठा वाटत असेल तर मला असं वाटतं की, जशास तसं उत्तर देणं हे तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी आपण मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT