प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छोटा भावाचं कोरोनाने निधन
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांचे छोटे भाऊ (Younger Brother) असीम बंदोपाध्याय यांचे आज (15 मे) सकाळी कोरोनाने (Corona) निधन झाले. असीम बंदोपाध्याय यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज आज त्यांचं निधन झालं. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिड प्रोटोकॉलनुसारच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. गेल्या एक […]
ADVERTISEMENT
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांचे छोटे भाऊ (Younger Brother) असीम बंदोपाध्याय यांचे आज (15 मे) सकाळी कोरोनाने (Corona) निधन झाले. असीम बंदोपाध्याय यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज आज त्यांचं निधन झालं. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिड प्रोटोकॉलनुसारच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर कोलकाताच्या मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये त्याच्यांवर उपचार सुरु होते.
ADVERTISEMENT
स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आज सकाळी असीम बंदोपाध्याय यांची तब्येत अचानक खालावली. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी येथील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्यांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. आलोक रॉय यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे धाकटे बंधू असीम यांच्यावर महिन्याभरापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांचं निधन झालं.
सीताराम येचुरी यांच्या अवघ्या 34 वर्षीय मुलाचं निधन, कोरोनाने घेतला बळी
हे वाचलं का?
पं. बंगालमध्ये मागील 24 तासात सापडले आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण
प. बंगालमध्ये काल (शुक्रवार) एका दिवसात आजवरचे सर्वाधिक 20,846 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 10,94,802 एवढी झाली आहे. तर प. बंगालमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 136 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत प. बंगालमध्ये 12,993 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
30 मे पर्यंत शाळा, महाविद्यालय बंद
ADVERTISEMENT
पश्चिम बंगालमधील कोरोना संसर्ग लक्षात घेता 30 मेपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारी आणि खासगी संस्था देखील बंदच राहतील. केवळ आपत्कालीन सेवा सुरू राहतील. याशिवाय लोकल रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सर्व राजकीय, प्रशासकीय, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली जाईल.
महाराष्ट्र कोरोनाने सावरतोय पण Black Fungus ने घेरलं, झपाट्याने वाढत आहेत रुग्ण
नुकतीच पार पडली प. बंगाल निवडणूक
दरम्यान, नुकतीच प. बंगालमधील विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांकडून लाखोंच्या सभा घेण्यात आल्या होत्या. यावेळी अनेकांनी या सभांवर टीका केली होती. एकीकडे देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असताना दुसरीकडे बंगालमध्ये मात्र लाखोंच्या सभा आणि रोड शो हे सुरु होते. खरं तर त्यावेळी प. बंगालमधील कोरोना रुग्णांची आकडेवारी ही कमी होती. पण निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा येथील कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, प. बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने जबरदस्त कामगिरी करत भाजपला अक्षरश: धूळ चारली. त्यामुळे प. बंगालमधील सत्ता कायम राखण्यात ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा यश आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT