संजय राठोडांचा ‘तो’ इशारा, चित्रा वाघ म्हणाल्या “कुणाच्या बापाला घाबरत नाही”
संजय राठोड यांच्या विरोधातली माझी लढाई सुरूच राहणार आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्यांनी जो कायदेशीर लढाईचा इशारा दिला त्यावर विचारलं असता मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. ‘आता शांत बसणार नाही,’ संजय राठोडांनी सोडलं मौन; चित्रा वाघ […]
ADVERTISEMENT

संजय राठोड यांच्या विरोधातली माझी लढाई सुरूच राहणार आहे. पूजा चव्हाणला न्याय मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. त्यांनी जो कायदेशीर लढाईचा इशारा दिला त्यावर विचारलं असता मी कुणाच्या बापाला घाबरत नाही असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
‘आता शांत बसणार नाही,’ संजय राठोडांनी सोडलं मौन; चित्रा वाघ यांना दिला हा इशारा!
काय म्हणाल्या आहेत चित्रा वाघ संजय राठोड यांच्याबाबत?
संजय राठोड यांची प्रतिक्रिया मी काल ऐकली. जे काही पुरावे असतील त्यांनी मला देऊ नये, न्याय व्यवस्थेला द्यावेत. त्यांना जे वाटतं आहे की मी निर्दोष आहे तर पुरावे न्यायालयाला द्यावेत. आमची लढाई जी आहे ती सुरूच आहे असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. प्रश्न उरला इशारा देण्याचा, तर मी कोणाच्याही इशाऱ्याला घाबरत नाही, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाण मृत्यू : अत्यंत दुर्दैवी; संजय राठोडांची मंत्रिमंडळात वर्णी, चित्रा वाघ भडकल्या










