काय आहे रश्मी शुक्ला यांनी लिहिलेल्या पत्रात? वाचा सविस्तर..

मुंबई तक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्या याचिकेत परमबीर सिंग यांनी एक संदर्भ जोडला आहे तो म्हणजे रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट महिन्यात पाठवलेल्या पत्राचा. मुंबई तकच्या हाती हे पत्र आलं असून आम्ही तुम्हाला सांगतो […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. त्या याचिकेत परमबीर सिंग यांनी एक संदर्भ जोडला आहे तो म्हणजे रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट महिन्यात पाठवलेल्या पत्राचा. मुंबई तकच्या हाती हे पत्र आलं असून आम्ही तुम्हाला सांगतो आहोत की राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या पत्रात नेमकी काय खंत व्यक्त केली आहे.

रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट २०२० ला लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

पोलिसांच्या बदलीसाठी काही राजकीय संबंध असलेले दलाल काम करत आहेत यासंदर्भातल्या तक्रारी आल्यानंतर आणि आरोप झाल्यानंतर मी हे संपूर्ण प्रकरण तपासलं. त्यासाठी काही फोनही टॅप केले. जाणीवपूर्वक काही फोन नंबर हे सर्व्हिलन्सवर होते. ज्यासाठीची मी रितसर परवानगी घेतली होती. या फोन टॅपिंग आणि इतर गोळा केलेल्या माहितीनंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यासंदर्भातली माहिती आपण तातडीने मुख्यमंत्र्यांना द्यायला हवी असं मला वाटतं आहे. जे आरोप झाले ते धक्कादायक आहेत आणि समोर आलेलं वास्तवही जळजळीत सत्य आहे.

पोलिसांच्या बदल्याचं रॅकेट आणि त्यासाठी काम करणारे काही दलाल कार्यरत आहेत. या सगळ्यांचा जवळचा संबंध काही राजकारण्यांशी आहे. हे देखील समोर आलं आहे. बदल्यांसाठी काम करणाऱ्या ब्रोकर्सचं रॅकेट आहे ही गंभीर बाब समोर आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षकापासून ते मोठ्या पदांपर्यंतच्या बदल्यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?